दारूबंदीसाठी उपोषण करणाऱ्या कार्य कर्त्यांच्या घरात सापडला दारूसाठा ,

पारनेर पोलीस ठाण्यात दोघां विरोधात गुन्हा दाखल
दत्ता ठुबे
पारनेर – प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील देवीभोयरे गावात दारूबंदीसाठी उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांच्या घरात गावठी दारूसाठा सापडला असल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे.त्यामुळे या अवैध दारू विक्री प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल आला आहे.
या संबंधीची फिर्याद पो.कॉ. प्रकाश सुभाष बोबडे वय ३३ यांनी दिली असून नितेश जयवंत गायकवाड व विकास जयवंत गायकवाड यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
.यावेळी पोलीस निरीक्षक- समीर बारवकर ,सहायक फौजदार- अशोक कडूस, पोहेकॉ विवेक गुजर, पोना- गहिनीनाथ यादव पोकॉ-सागर धुमाळ, पोकॉ- बोबडे, पोकॉ -तोरडमल यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
देवीभोयरे गावातील गायकवाड यांच्या राहत्या घरी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या सह साह्य फौजदार अशोक कडूस व निघोज पोलीसांनी छापा टाकून १ हजार ८०० रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली आहे.या घटनेला पो नि समीर बारवकर यांनी दुजोरा दिला असून या दारू विक्रेत्यांने दुसऱ्यांदा दारूबंदीसाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचे पो नि समीर बारवकर यांनी सांगितले.
नितेश गायकवाड यांनी २३ एप्रिल रोजी चार दिवस पारनेर पोलिस ठाण्यासमोरच देवीभोयरे येथील दारु विक्री विरोधात उपोषण केले होते. तसेच गेली दोन दिवसांपूर्वी लेखी निवेदनाद्वारे पुन्हा उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र ज्या घरात दारु मिळाली आहे ते घर गायकवाड यांच्या चुलत्याच्या नावावर असून या घराच्या माळजावर ही दारु आढळून आली होती. याबाबत पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी समक्ष येऊन पाहणी केली तसेच या वरील गायकवाड बंधूंना पोलीसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडण्यात आले आहे. या कारवाईवेळी ग्रामस्थांसह महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.