ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी- रुपेश ढवण

दत्ता ठुबे /पारनेर :
-ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी युवा नेते रुपेश ढवण यांनी केलीआहे
हाता तोंडाशी आलेल्या पिकांची नुकसान झालेले आहे.टरबूज ,कलिंगड तसेच आणखी विविध प्रकारच्या फळबागा असतील यांचे खूप मोठ्या प्रमाणात पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि म्हणून तहसीलदारांनी तलाठ्यांना सरसकट पंचनामे करून संबंधित प्रशासनाला आदेश देऊन ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी कारण आधीच शेतकरी कर्जबाजारी आणि आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि अशावेळी आपल्या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठीमागे उभं राहणे हे आपल्या सरकारचे आणि प्रशासनाचे कर्तव्य आहे.ते कर्तव्य समजून आपण शेतकऱ्याला आधार देण्याची गरज असताना शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे या उद्देशाने सरकारने व प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अग्रेसर राहून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे अशी अपेक्षाही ढवण यांनी व्यक्त केली.