आदिम जमातीतील विद्यार्थ्यांना आदिवासी मुलांच्या वसतीगृह प्रवेशात प्राधान्य द्यावे- डाॅ.किरण लहामटे

अकोले-शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच अहिल्यानगर जिल्ह्य़ातील आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सोईसुविधांबाबत आश्रम शाळेतील मुख्याध्यापक गृहपाल व वैद्यकीय अधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक आज दि.14/06/2025 रोजी प्रकल्प कार्यालय राजुर येथे आयोजित करण्यात आली होती.
सदर आढावा बैठकीत आदिम जमातीतील कतकरी, ठाकर, पारधी समाजातील विद्यार्थ्यांना आदिवासी मुलांच्या वसतीगृह प्रवेशात प्राधान्य द्यावे असे आवाहन राजुर येथे आयोजित बैठकीत डाॅ.श्री.किरण लहामटे यांनी केले.
सदर आढावा बैठकीत आश्रमशाळेतील व वसतीगृहातील सोईसुविधांबाबत आढावा घेण्यात आला
सदर आढावा बैठकीत शासकीय आश्रम शाळेतील गरम पाण्याची सुविधा,विद्यार्थीप्रमाणात संडास, बाथरूम या पायाभूत सुविधांबाबत तसेच दर्जेदार शासननियमानुसार भोजन देणे,चांगल्याप्रकारची विद्यार्थीनिवास व्यवस्था, विद्यार्थी सुरक्षा, या बाबत शासकीय व अनुदानित आश्रम शाळानिहाय आढावा घेण्यात आला.
आदिवासी आश्रम शाळेसाठी नेमलेले वैद्यकीय पथक व ॲब्युलन्स सेवा सदैव तत्पर ठेवून मुलांना स्थानिक पातळीवर तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे व औषधोपचार मिळणेबाबत वैद्यकीय पथकाने फक्त आश्रमशाळेवरच लक्ष केंद्रित करणेविषयी उपस्थित वैद्यकीय पथकांना अवगत केले तसेच एकाही आश्रमशाळेतील विद्यार्थी वैद्यकीय सुविधांपासून वंचित रहाणार नाही या बाबत खबरदारी घेण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.
तसेच शहरी भागातील आदिवासी मुला-मुलींच्या वसतीगृहांच्या प्रवेश क्षमतेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा.असे आमदार महोदयांनी सुचित केले.कुठलाही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित ठेवू नये असेही आवाहन आढावा बैठकीत करण्यात आले.तसेच वसतीगृह विद्यार्थी शिस्तबद्ध कसा राहील यासाठी गृहपालांनी प्रयत्न करुन संघटनात्मक राजकारणापासून वसतीगृह विद्यार्थी वेगळे कसे रहातील यासाठी गृहपालांनी वसतीगृह परीसरात आसणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार डाॅ.श्री.किरण लहामटे यांनी केले.
आढावा बैठकीसाठी राजूर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे, दिपक कालेकर, मनोजकुमार पैठणकर, तुषार पवार, हे सहा.प्रकल्प अधिकारी, सुनिल मोरे, शाम कांबळे हे कार्यालयीन अधिक्षक, लेखाधिकारी संजय सोनवणे तसेच विविध विभागाचे कर्मचारी,वैद्यकीय विभागाचे अधिकारी, अहिल्यानगर जिल्ह्य़ातील शासकीय, अनुदानित आश्रम शाळांचे मुख्याध्यापक. जिल्ह्य़ातील सर्व आदिवासी मुला-मुलींचे वसतीगृहाचे गृहपाल उपस्थित होते.