आजचे पंचांग व राशी भविष्य दि १८/०६/२०२५,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ २८ शके १९४७
दिनांक :- १८/०६/२०२५,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०६,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर ग्रीष्मऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- सप्तमी समाप्ति १३:३५,
नक्षत्र :- पूर्वाभाद्रपदा समाप्ति २४:२३,
योग :- प्रीति समाप्ति ०७:४०, आयुष्मान २९:२४,
करण :- बालव समाप्ति २४:४९,
चंद्र राशि :- कुंभ,(१८:३५नं. मीन),
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – मृग,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मेष,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:३० ते ०२:०९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०५:५५ ते ०७:३४ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:३४ ते ०९:५१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५१ ते १२:३० पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:२७ ते ०७:०६ पर्यंत,
❀ दिन विशेष:
कालाष्टमी, अष्टमी श्राद्ध,
————–
:
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ २८ शके १९४७
दिनांक = १८/०६/२०२५
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
मैत्रीखातर आज आपल्याला काहीतरी विशेष करावे लागेल. आज काही निर्णय आयुष्यात महत्त्वाचे ठरतील. जुन्या रेंगाळलेल्या गोष्टी आज मार्गी लागण्याची शक्यता आहे.
वृषभ
धरसोड वृत्तीने आज काम करूच नका. आपले ध्येय समोर ठेवून काम केल्यास योग्य ते फळ मिळेल. बॉसकडून प्रोत्साहन मिळेल. मनोरंजनात्मक कार्यामध्ये पुढाकार घ्याल. सामाजिक क्षेत्रात दबदबा राहील.
मिथुन
भाग्यकारक घटनांचा आजचा दिवस आहे. तीर्थक्षेत्री भेटी होतील. मनामध्ये ठरवलेल्या गोष्टी सहज तशाच घडताना दिसून येतील. लांबचे प्रगस होतील.
कर्क
बायकोकडून धनायोगाची शक्यता आहे. पैशाशी निगडित व्यवहार सेट करण्यात आजचा दिवस व्यस्त राहील. काही कामे एकट्यानेच अंगावर येऊन पडतील. दिवस संमिश्र आहे.
सिंह
आजचा दिवस तडजोडीचा आहे. ठरवले तसेच होईल असं नाही. जोडीदाराचे मोठेपण मान्य करावे लागेल. सरकारी कामांमध्ये मात्र यश मिळणार आहे.
कन्या
तब्येतीच्या तक्रारी वाढतील. मानसिकता थोडी खराबच राहील. इतरांच्या सल्ल्याने आज वागणे चुकीचे ठरेल. नोकरीत प्रगती आहे. दिवस बरा राहील.
तूळ
रसभरीत प्रेमाचा आजचा दिवस आहे. दिवसाला गुलाबी छटा मिळेल. पावसाला जसे उधाण आहे तसेच मनाला येईल. प्रणयी दिवस राहणार आहे. धन मिळेल.
वृश्चिक
काही वेळेला एकटाच दिवस घालवावे असे वाटते. आज शांतता जास्त मनाला भाजेल. जमिनीशी निगडित व्यवहार पूर्ण पडतील. गाड्यांची क्रेझ आज वाढती राहील.
धनु
भावंडांचे विशेष सहकार्य आपल्याला लाभेल. आपल्या पराक्रमावर जिद्दीने कामाचे नवी नवी दालने पार पाडाल. चिकाटीने यश मिळवाल. स्वतःच्या कार्यावर स्वतःला अभिमान वाटेल.
मकर
कुटुंबीयांमध्ये ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करावी लागेल. गुंतवणुकीमध्ये फायदा आहे. पुढील कामाचे नियोजन सहज घडेल. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सल्ल्याने पुढे जाल.
कुंभ
संशोधनात्मक कार्यामध्ये यश मिळेल. काही गोष्टी स्वतःला भावल्या तरच आपण करता. आज सकारात्मकता वाढवणारा दिवस आहे. आरोग्यही उत्तम राहील. आपल्या असण्याने इतरांवर प्रभाव राहील.
मीन
कामाच्या गोष्टीचे व्यवस्थापन आज असणे गरजेचे आहे. नाहीतर त्रेधा तिरपीट उडेल. ठरवून गोष्टी करा. खर्चाचे प्रमाण सुद्धा वाढते राहील. विशेष काळजी घ्यावी.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर