इतर

आषाढी एकादशी निमित्त जखणगाव (अहिल्यानगर )ते पंढरपूर एक दिवसीय दिंडी

अहिल्या नगर दी 19
सालाबाद प्रमाणे यंदाही आरोग्य ग्राम जखणगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी एक दिवसीय दिंडी शनिवार दिनांक ५ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक आठ वाजता जखणगाव येथून निघणार आहे

सकाळी आठ वाजता नगर येथील चांदणी चौक सोलापूर रोडवरील उड्डाण पूलाखालून निघणार आहे. त्यानंतर एसटीने निघणारी व खाजगी लक्झरी बसेस निघणारी ही दिंडी सकाळी ११ वाजता श्रीक्षेत्र करमाळा येथे कमलादेवी मंदिरात मध्यान्ह भोजन ,भजन व भक्ती प्रकल्प यासाठी दोन तास थांबणार आहे. त्यानंतर ही दिंडी दुपारी चार वाजेपर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथील देगलूरकर मठापाशी सर्वात उंच विठ्ठलाची मूर्ती असणाऱ्या प्रांगणामध्ये रिंगण सोहळ्यासाठी थांबणार आहे. रिंगण सोहळा, हरिपाठ झाल्यावर तिथून पुढे पायी दिंडी ही चंद्रभागेच्या स्नानासाठी भजन ,गायन ,वादन करत वाळवंटात थांबेल.त्यानंतर ही दिंडी विठ्ठल मंदिर परिसरामध्ये मंदिर प्रदक्षिणा ,नामदेव पायरी दर्शन व परमात्मा पांडुरंगाचे मुखदर्शन करण्यासाठी पोहचेल . रात्री त्याच परिसरात अल्पसा प्रसाद घेऊन एकादशी ला पहाटे साडेबारा ते एकच्या सुमारास ही दिंडी परतीच्या प्रवासाला निघेल. सर्व गोष्टी वेळेनुसार अनुकूल झाल्या तर दिंडी सकाळी सूर्योदयाच्या आधी अहिल्यानगर व जखणगावी परत पोहोचेल. या दिंडीमध्ये कुणाकडूनही दिंडी शुल्क घेतले जाणार नाही. ज्यांना एसटीच्या सवलतीचा लाभ घेण्याची इच्छा आहे ,अशांसाठी एसटी महामंडळाच्या बसेस जखणगाव येथील हटकेश्वर मंदिरापासून निघणार आहेत. ज्यांना खाजगी लक्झरी बसेस या दिंडीसाठी यायचं असेल अशांसाठी लक्झरी बसेस सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहेत . जखणगांव ते पंढरपूर व पंढरपूर ते जखणगांव अशा प्रवासासाठी एकूण 780 रुपये पूर्ण तिकिटाचा खर्च होतो, परंतु आपण ५५५ रुपये अशा नाममात्र शुल्कामध्ये ही दिंडी प्रवासी खर्चासाठी बसेसला पैसे गोळा करून देणार आहोत .कुणाकडूनही भोजन व्यवस्था किंवा रस्त्याने लागणारा इतर खर्च घेतला जाणार नाही.आतापर्यंत दिंडीचे हे १४वे यशस्वी वर्षे असून सर्व भाविक भक्तीभावाने या दिंडीत सहभागी होत असतात. खरे तर पायी वारी नगरहून पंढरपूर साठी सुमारे ११ दिवसाचा कालावधी लागणारा एक मोठा उपक्रम आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात व कार्यमग्न समाजात एवढा वेळ असणाऱ्या लोकांची संख्या अत्यल्प आहे .इच्छा असूनही अशा मोठ्या दिंडीत सर्वांना सहभागी होता येत नाही.परंतु या अशा मोठ्या दिंडीमध्ये असणाऱ्या सर्व उपक्रमांचा आनंद आपल्या एकदिवसीय दिंडीमध्ये मिळत असल्याने खूप तज्ञ, हुशार ,व्यस्त, अधिकारी, पदाधिकारी, व्यापारी, व्यावसायिक ,नोकरदार असे सर्व सुज्ञ मंडळी आपल्या दिंडीमध्ये सहभागी होतात व समाधान पावतात .यंदाही सर्व भाविकांना ही सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे .तरी सर्व भाविकांनी आपली नावे जखणगांव येथील गंधे हॉस्पिटल येथे व अहिल्यानगर येथील श्रीरंग राहींज गिर्यारोहक यांच्याकडे नोंदवावीत व खाजगी बसेसने येणाऱ्या लोकांनी ५५५ चे शुल्क डॉक्टर सुनील गंधे व श्रीयुत राहींज साहेब यांच्याकडे नांव नोंदणीच्या वेळीच जमा करावे. कृपया या आर्थिक व्यवहारात कोणाला गैरसमज किंवा शंका असल्यास फोन करून माझेशी प्रत्यक्ष संपर्क करावा. या दिंडीचा जुना व नवीन अशा सर्व लोकांचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे .नोंदणी करणाऱ्या सर्वांना त्यात समाविष्ट केले जाईल.


डॉ सुनिल गंधे
विठ्ठल भक्त तथा
सरपंच आरोग्य ग्राम जखणगांव ता नगर
जि अहिल्यानगर
९८९००२४४२१
श्रीरंग राहींज साहेब
गिर्यारोहक
अहिल्यानगर
८८८८४३८७५५
🙏🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button