इतर
जागतिक योग दिनीं अकोल्यात जेलमधील कैद्यांना दिले योगाचे प्रशिक्षण

अकोले प्रतिनिधी
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आजजिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहिल्यानगर व तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्थर अकोले श्री धीरज हिंग्लजकर पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली अकोले सबजेल मध्ये सर्व कैद्यांना योग प्रशिक्षण देण्यात आले.
याप्रसंगी योग प्रशिक्षक, अधिकार मित्र दत्तात्रय शेणकर ,ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष तथा अधिकार मित्र मच्छिंद्र मंडलिक, अकोले सबजेलचे तुरुंग अधिकारी किसन लोहरे इत्यादी हजर होते.
