निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून खडकवाडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

निलेश लंके प्रतिष्ठान विद्यार्थ्यांच्या पाठीशी : दीपक लंके
दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
खडकवाडी परिसरातील दुर्गम भागात असलेल्या जांभूळवाडी, कुरण वस्ती आणि बोरवाक येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा नेते योगेश शिंदे यांनी शालेय साहित्याचे वाटप केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, जेवणाचा डबा, पाऊच यासह खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके उपस्थित होते. त्यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे, शिक्षक नेते संतोष खामकर, बापू चत्तर आदी मान्यवर उपस्थित होते. स्थानिक नागरिक, विशेषतः महिलांचा मोठा सहभाग होता. दीपक लंके यांनी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून विशेष समाधान व्यक्त केले.
ते म्हणाले, “निलेश लंके प्रतिष्ठान विद्यार्थ्यांच्या पाठीशी सदैव उभे आहे. निलेश लंके यांच्या कार्याचा वारसा गावागावात राबवला जात आहे, याचा विशेष आनंद आहे.” कार्यक्रमात खडकवाडी गावातील श्रीरंग रोकडे, माणिक रोहोकले, भास्कर रोकडे, कृष्णा शिंदे, रोहिदास शिंदे, सुभाष शिंदे, संतोष शिंदे, मुरली शिंदे, निखिल मोढवे, वैभव चौधरी, संदीप वाळुंज, सतीश हुलावळे, चेतन गागरे, सागर शिंगोटे, अभिजीत गागरे, गणेश शिंदे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. तसेच, खेवजी भुतांबरे, शंकर केदार, बुधा केदार, रखमा केदार, पुना केदार, सुखदेव केदार, सुखदेव मधे, गोरक्ष जाधव, अनिल केदार, सिताराम चिकणे यांच्यासह पालकांचा मोठा सहभाग होता.
कार्यक्रमाचे नियोजन योगेश शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. नितीन ढोकळे यांनी केले. शिक्षक प्रवीण ठुबे सर , साळुंखे सर , रोहोकले सर , भांड सर आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. सर्वांचे आभार योगेश शिंदे यांनी मानले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा ठरला.
खासदार निलेश लंके यांच्या सामाजिक विचारांना प्रेरणा ठेवून खडकवाडी सारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे यापुढील काळातही सर्वसामान्य लोकांसाठी समाज उपयोगी उपक्रम राबवणार आहे.
योगेश शिंदे (खडकवाडी)