सर्वसामान्य जनतेपर्यंत शासकीय सेवा पोहोचवा : दीपक लंके

बाळासाहेब खिलारी यांच्या वतीने खडकवाडी येथे रेशन कार्ड कॅम्प
दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्याच्या उत्तर भागातील खडकवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो खासदार निलेश लंके यांच्या प्रेरणेतून बाळासाहेब खिलारी शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, असे राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके यांनी नमूद केले.
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील खडकवाडी गावात निलेश लंके प्रतिष्ठानने शासकीय सेवा घरपोच मिळाव्यात या उद्देशाने मोफत कॅम्प आयोजित केला. प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कॅम्पमध्ये रेशन कार्ड दुरुस्ती, नवीन रेशन कार्ड आणि अभा कार्ड (आरोग्य कार्ड) यासारख्या सुविधा मोफत देण्यात आल्या. यामुळे खडकवाडी आणि परिसरातील सर्वसामान्य जनतेला मोठा लाभ झाला. बाळासाहेब खिलारी यांनी सांगितले की, 500 हून अधिक लोकांनी या कॅम्पद्वारे रेशन कार्ड अपडेट आणि ऑनलाइन प्रक्रियेचा लाभ घेतला.कॅम्पच्या उद्घाटनाला राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कॅम्पला सामाजिक कार्यकर्ते मोहन रोकडे, युवा नेते अनिल गंधाक्ते, श्रीरंग रोकडे, सरपंच संजय रोकडे, भोद्रे सरपंच अभिजीत झावरे, गंगाधर बांडे, काकणेवाडी सरपंच अशोक वाळुंज, अशोक नऱ्हे, भाऊ निवडूंगे, दादा दळवी, राजू रोकडे, बजरंग गागरे, अशपाक हवालदार, नितीन ढोकळे, विष्णु शिंदे, सुभाष ढोकळे, सुयोग दाते, विशाल गागरे, रवींद्र ढोकळे, प्रदीप ढोकळे, योगेश शिंदे, डॉ. रावसाहेब आग्रे, मारुती आग्रे, विठ्ठल शिंदे, कैलास आग्रे, वैभव गुंड, सचिन भोर, बाबा भोर, विशाल वाडेकर, उत्तम नरे, बाळासाहेब नऱ्हे, प्रशांत धरम, डॉ. बाबासाहेब गांगड, डॉ. उदय बर्वे, दत्तात्रय साळुंके यांच्यासह टाकळी ढोकेश्वर परिसरातील सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्ते उपस्थित होते. निलेश लंके प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे शासकीय सेवांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचला.
शासकीय कागदपत्रांच्या बाबतीत सर्वसामान्य जनतेची शासन स्तरावर मोठी नेहमीच पिळवणूक होत असते हे ओळखून या शासकीय सेवा घरपोच मिळाव्यात हा उद्देश समोर ठेवून मतदारसंघात शासकीय सेवांचा रेशन कार्ड कॅम्प आयोजित केला आहे.
बाळासाहेब खिलारी
(अध्यक्ष- निलेश लंके प्रतिष्ठान पारनेर)