संरक्षण विभागातुन सेवानिवृत्त झालेले बापूसाहेब देशमुख यांचा रविवारी अभिष्टचिंतन व स्मरणिका प्रकाशन सोहळा

समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख,
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची उपस्थिती
कोतुळ प्रतिनिधी
संरक्षण विभागातील सेवेतून सेवानिवृत्त झालेले कोतुळ (भोळेवाडी) ता अकोले येथील भूमिपुत्र बापूसाहेब देशमुख यांचा अभिष्टचिंतन व स्मरणिका प्रकाशन सोहळा रविवार दिनांक २९ जून २०२५ सकाळी १०.०० वा.इंद्रप्रस्थ हॉल, कोतुळ, ता. अकोले, जि. अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे
समाज प्रबोधनकार ह.भ. प. निवृत्ती महाराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे,माजी आमदार वैभवराव पिचड , अगस्ती सह. साखर कारखाना चेअरमन सिताराम पाटील गायकर, अगस्ती सह. साखर कारखाना चे व्हा. चेअरमन श्रीमती सुनिता ताई भांगरे अभिनवचे अध्यक्ष श्री. मधुकरराव नवले, सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्री. बी. जे. देशमुख, उद्योजक श्री. रोहिदास दांगट पतितपावन संघटना अध्यक्ष प्राध्यापक एस झेड देशमुख, लिज्जत पापड चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेशराव कोते,माजी प्राचार्य एन. बी. जाधव, हडपसर चे नगरसेवक विजय देशमुख, राजेंद्र नानासाहेब देशमुख,कैलासराव शेळके, महेश नवले, जालिंदर वाकचौरे,गणेश महाले, शिवाजीराजे धुमाळ, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मरणिकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे
बापूसाहेब देशमुख यांची संरक्षण विभागातील वाहन गुणवत्ता विभागात निवड झाल्यावर अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज मधील नोकरी सोडून डिसेंबर १९८९ मध्ये अहमदनगर (अताचे अहिल्यानगर) येथे रुजू झाल्यानंतर पुढे पुणे व दिल्ली येथे सेवा करून शेवटी पुणे येथुन Tech Officer या पदावरून दिनांक ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले
साडे पस्तीस वर्षे सेवेत असताना बोफोर्स तोफांवर देशी इंजिन बसविणे ह्या प्रोजेक्ट साठी technical टीम मध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. एकुण तीन वेळा गुणवत्ता आश्वासन महनिदेशालयाने गुणता पुरस्कार देवून सन्मान केला.