इंजि.निलेश ज्ञानदेव गायकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा..

अकोले प्रतिनिधी
– राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा माजी उपाध्यक्ष व युवा सामाजिक कार्यकर्ते तसेच साई एंटरप्राईजेस उद्योग समूहाचे संचालक, अगस्ती पतसंस्थेचे संचालक उद्योजक इंजि. निलेश ज्ञानदेव गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे “एक हात मदतीचा” या संकल्पने नुसार अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागतील जिल्हा परिषद शाळा कुमशेत , बोरीचीवाडी, उंबरवाडी, लव्हाळवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे तसेच दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू , खाऊ यांचे वाटप करत साजरा करण्यात आला.
त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी जिल्हा परिषद संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना निलेश गायकर म्हणाले, मी दर वर्षी माझा वाढदिवस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , कार्यसम्राट आमदार किरण लहामटे साहेब, तसेच आमचे आधारस्तंभ अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सहकारमहर्षी सीताराम पाटील गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमांनी साजरा करत असतो.
आपल्या आदिवासी भागातील मुलांना शिक्षणात आपला ही खारीचा वाटा असावा या उद्देशाने मी गेल्या 2011 पासून ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच दैनंदिन लागणारे साहित्य यांचे वाटप विविध भागातील आदिवासी आश्रम शाळा , वृध्द आश्रम ,शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या समवेत करत असून वाढदिवशी होणाऱ्या वायफळ खर्चाचा मी यासाठी उपयोग करत असतो.
उद्योजक इंजि.निलेश गायकर हे त्यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम तसेच शालेय विद्यार्थ्यांना , गरजू वृध्द लोकांना लागणारी मदत यांच्या माध्यमातून करत असतात त्यांच्या या उपक्रमाचे नेहमीच विविध स्तरातून कौतुक केले जाते.
याप्रसंगी भांगरे सर , आरोटे मॅडम , अनुजशेठ देशमुख , वाकचौरे सर, गिऱ्हे सर,मुन्ना शेठ शेख, संदीप भाऊ शेळके , अभिजित खर्डे, सुयशराव शेळके,चिंतामण अस्वले , बारकु अस्वले , संदीप अस्वले , योगेश काळे, आशिष राऊत यांच्या सह संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.