पानोली येथे शेतकरी संवाद मेळावा संपन्न

पारनेर दि.२ पारनेर प्रतिनिधी
पानोली ग्रामस्थ आणि परिसरातील कांदा उत्पादन शेतकऱ्यांना कांद्या उत्पादन विषयी सखोल मार्गदर्शन करण्यासाठी कालकथित बाळासाहेब साळवे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने उपसरपंच प्रशांत साळवे आणि प्रदीप साळवे यांच्या संकल्पनेतून पानोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह येथे शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होते .
यावेळी शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे शास्त्रज्ञ डॉ. योगेश यादव, ज्ञानदेव लंके,पंकज कारखिले, विजय औटी, दादाभाऊ वारे, विक्रमसिंह कळमकर,सरपंच संदीप गाडेकर, यावेळी ज्ञानदेव लंके, पंकज कारखिले, दादाभाऊ वारे, अमोल साळवे , तुकाराम वाखारे, डॉ.रामचंद्र थोरात, शिवाजी शिंदे, अनिल गाडेकर, आबासाहेब गायकवाड, लखन थोरात, प्रवीण थोरात, नवनाथ खामकर, शशिकांत गाडेकर, इंद्रभान गाडेकर, पंचशील फाऊंडेशन पदाधिकारी आणि गावातील शेतकरी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. यादव म्हणाले की, जमीन आरोग्य व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन योग्य केले तर कांदा उत्पादन वाढते व शाश्वत कांदा उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीतील माती परीक्षण करणे आवश्यक आहे. मातीचे योग्य परीक्षण केले तर त्या प्रमाणात खतांचे नियोजन करण्यात येऊन कांदा उत्पादन करण्यास मदत होते.
शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक खते वापरण्यावर भर दिला पाहिजे.
तर डॉ. गावडे यांनी शाश्वत कांदा उत्पादन तंत्रद्यान या विषयी सखोल मार्गदर्शन केले ते म्हणाले की, शेती मध्ये जास्तच जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर जैविक खतांचा वापर केला गेला पाहिजे. तर रासायनिक खतांचा वापर हा कमीत कमी करण्यात आला पाहिजे. माती परीक्षण, जैविक खते, पाणी व्यवस्थापन, यांचे व्यवस्थापन योग्य असेल तर शाश्वत कांदा उत्पादन घेता येते. परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रद्यानचा वापर करून उत्पादन घ्यावे असे आवाहन केले..
यावेळी प्रास्ताविक नवनाथ खामकर यांनी केले तर आभार संतोष खोडदे यांनी मानले