कोरठण खंडोबा गडावर रंगला कुस्त्यांचा आखाडा!

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा देवस्थान या राज्यस्तरीय “ब” वर्ग तीर्थक्षेत्रावर परंपरेनुसार रविवार( दिनांक 14) रोजी हगामा उत्सव कुस्त्यांचा आखाडा उत्साहात पार पडला
. कोरोनाच्या दोन वर्षा नंतर कुस्त्यांचा आखाडा कोरठणगडावर भरल्यामुळे कुस्तीप्रेमी भाविक भक्तांमध्ये मोठा उत्साह होता. पावसाळी वातावरण असतानाही शेकडो कुस्तीप्रेमी भाविक भक्तांनी व पैलवान मंडळींनी कुस्ती आखाड्यामध्ये गर्दी केली होती.
कुस्ती आखाडा मैदानाचे उद्घाटन उपसरपंच महादेव पुंडे, रामदास मुळे,निवृत्ती चौधरी,पोपट चिकने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुस्त्यांना सुरुवात झाली पारनेर, अहमदनगर, शिरूर, हरियाणा, जुन्नर, अकोले इत्यादी ठिकाणावरून आलेल्या नामांकित पैलवानांच्या निकाली कुस्त्या झाल्या लहान व तरुण पैलवानांचा समावेश मोठ्या संख्येने होता. 200/250 कुस्त्या होताना उपस्थित कुस्तीप्रेमी जनतेने वैयक्तिक इनाम देऊन चांगली दाद दिली.
आखाड्यात शेवटची कुस्ती 15 हजार रुपये इनामावर पैलवान अनिल ब्राह्मणे उत्तर महाराष्ट्र केसरी राहणार राहुरी आणि पैलवान योगेश पवार राहणार नेप्ती या दोन पैलवानांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या हगामा उत्सवामध्ये पारनेर तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान युवराज पठारे, उद्योजक दिनेश शेठ घोलप, पैलवान गुंडा भोसले, पैलवान रामभाऊ सासवडे, माजी मल्ल -पैलवान प्रकाश चिकणे, पैलवान साहेबराव चिकणे, डॉक्टर मापारी, डॉक्टर शिंदे, ग्रामसेवक हरीश भालेराव, देवस्थानचे अध्यक्ष ॲड पांडुरंग गायकवाड विश्वस्त किसन धुमाळ, बन्सी ढोमे, किसन मुंढे, तंटामुक्ती अध्यक्ष गोपीनाथ घुले, माजी सरपंच अशोक घुले, ग्रामपंचायत सदस्य तान्हाजी मुळे, स्वप्निल जगताप, अमोल घुले, रवी गोसावी, सोसायटी सदस्य बबन नवले, भगवान भांबरे, बाळासाहेब पुंडे, बबन सुपेकर, गोपीनाथ सुंबरे, साहेबराव पंडित, कारेगाव सरपंच बापूराव ठूबे, योगेश पुंडे सचिन पुंडे नवनाथ पुंडे व ग्रामस्थ व भावी भक्त मोठ्या संख्येने होते. जालिंदर खोसे व उत्तम सुंबरे सर यांनी सूत्रसंचालन केले. हगामा उत्सवा निमित्त महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ कुस्तीप्रेमी व भाविक भक्तांनी घेतला. टाकळी पोलीस दुरुक्षेत्राचे कर्मचारी श्री साळवे व श्री वेताळ यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

——–