ध्येयवेडेपणांनी केलेले कार्य राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचले- हेरंब कुलकर्णी

अकोले/प्रतिनिधी
ध्यास घेऊन ध्येयवेडेपणांनी केलेले कार्य राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचले हा माझा गौरव एकट्याचा नसून सर्व सहकाऱ्यांचाआहे, ज्या मातीने मला घडवले त्या मातीचा गौरव आहे. विधायक कामा साठी ठामपणे उभे राहून प्रामाणिक कार्य केले तर त्यातून निश्चितच समाजाचे भले होते. विधायक कार्याची पोचपावती पुरस्काराच्या रूपाने मिळाल्याचे समाधान आहे परंतु त्यापेक्षा जास्त समाधान कार्याचा व्याप व व्यास वाढत असल्याचे आहे असे प्रतिपादन गिरीश गांधी सामाजिक राष्ट्रीय पुरस्कार विजेते हेरंब कुलकर्णी यांनी केले.
वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात डॉ.अभय बंग यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्कारामुळे श्री स्वामी समर्थ सेवा संस्था राजुर यांच्यावतीने जन्मभूमी व कर्मभूमीत सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी संस्थेचे विश्वस्त प्रकाश टाकळकर ,संस्थेचे सचिव शांताराम काळे, कोषाध्यक्ष संतोष बनसोडे, वृक्षमित्र रमाकांत डेरे,विनय सावंत, सामाजिक कार्यकर्ते संतोष मुतडक ,गोकुळ कानकाटे, प्रेमानंद पवार उपस्थित होते.
प्रमुख अतिथी प्रकाश टाकळकर यांनी महाराष्ट्रभर ज्यांच्या कार्याचा गौरव केला जातो ते हेरंब कुलकर्णी पुरस्कारासाठी काम करत नसून सेवाभावी वृत्तीने कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्व क्षेत्रात काम करत आहे त्यांना हा पुरस्कार मिळाला ही बाब मोठी आहे .शिक्षण क्षेत्रातील हा महत्त्वाचा पुरस्कार आहे . हेरंब कुलकर्णी यांनी शासन दरबारी केलं महात्मा गांधींचे स्वप्न पहा त्या स्वप्नात सर्वांना सामावून घ्या असे हेरंब कुलकर्णी चे कार्य चालू आहे हा माझा पुरस्कार नसून हा कार्याचा पुरस्कार आहे
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव शांताराम काळे यांनी हेरंब कुलकर्णी यांचे कार्य सेवाभावी वृत्तीने महाराष्ट्रभर चालू आहे .सर्व क्षेत्र त्यांनी पिंजून काढलेले आहे या कार्यात त्यांच्या अर्धांगिनीची मदत खूप मोलाची लाभलेली आहे .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण भागवत यांनी केले . सूत्रसंचालन विनायक साळवे यांनी तर आभार तानाजी फापाळे यांनी मानले .