अकोल्यातील कोकणवाडीत पारंपारिक पद्धतीने बैलपोळा साजरा.

अकोले प्रतिनिधी
अकोली तालुक्यातील कोकणवाडी येथे आदिवासी पारंपारिक पद्धतीने बैलपोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला
बैलपोळा या सणानिमित्त घराघरात उत्साह बघायला मिळाला. ग्रामदैवत बाल भैरवनाथ आणि शेतातील पिकाला चवार बांधून या सणाला सुरूवात झाली. दुपारी बैलांना स्वच्छ धुवून, सजवून, बासिंग बांधून मंदिराकडे आणण्यात आले. पावसाचा जोर वाढला होता तरीही पावसाबरोबर शेतकऱ्यांच्या चेहर्यावरील आनंदही ओसंडून वाहत होता. सायंकाळी बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्री काळू सोमा जाधव यांच्या मधल्या वाड्याला पोळ्याचा मान असतो. सर्व शेतकऱ्यांची बैले सजवून आल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालून, देवाला नारळ फोडून कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी गावतील ग्रामस्त, तरुण मित्र मंडळ, सरपंच, उपसरपंच, सरस्य त्याचबरोबर श्री महादू बेंडकोळी, गुलाब गोड़े, हिरामण जाधव, तुकाराम दत्तु जाधव, देविदास जाधव, शंकर जाधव, ज्ञानेश्वर जाधव, तुषार जाधव, जगण जाधव, गुलाब जाधव, माजी सरपंच श्री नारायण जाधव, सुरेश जाधव, विष्णू जाधव, तसेच कामगार कमिटीचे श्री त्रिंबक ठका बेंडकोळी, संतु जाधव उपस्थित होते.



