वाघापूर च्या सरपंच सौ रंजना बराते आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित.!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील वाघापूर गावच्या सरपंच सौ रंजना महेंद्र बराते यांना नुकतेच आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय सरपंच पुरस्कार सोहळा पार पडला या सोहळ्यात सौं रंजना बराते यांना सन्मानित करण्यात आले
स्वराज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे, ग्रामसेवक संघांचे नेते एकनाथ ढाकणे या मान्यवरांच्या शुभहस्ते महंत डॉ श्रीकांतदास महाराज धुमाळ, , आमदार रोहित पवार यादवराव पावसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार सोहळा सम्पन्न झाला
सौं बराते या कृषिभूषण डॉ.महेंद्र रघुनाथ बराते यांच्या पत्नी असून त्यांनी गावाच्या विकासासाठी प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने अल्पवधीतच गावात अनेक विकास कामे मार्गी लावले त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला
स्वराज्य सरपंच सेवा संघाने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन माझा सन्मान केला,बिनविरोध निवडून देऊन मला जनतेने काम करण्याची संधी दिली या पुढेही विकास कामांचा वेग अधिक वाढवू मला मिळालेला सन्मान हा माझा नसून खऱ्या अर्थाने गावातील जनतेचा सन्मान झाला असल्याचे सरपंच सौ रंजना महेंद्र बराते यांनी सांगितले
