आजचे पंचांग व राशी भविष्य दि. ०२/०९/२०२५,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद ११ शके १९४७
दिनांक :- ०२/०९/२०२५,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४१,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति २७:५३,
नक्षत्र :- मूळ समाप्ति २१:५१,
योग :- प्रीति समाप्ति १६:३९,
करण :- तैतिल समाप्ति १५:२३,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पूर्वा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- कर्क,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:३५ ते ०५:०८ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५५ ते १२:२९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:२९ ते ०२:०३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३५ ते ०५:०८ पर्यंत,
❀ दिन विशेष:
गौरी विसर्जन २१:५१ प., दोरे घेणे,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १२ शके १९४७
दिनांक = ०२/०९/२०२५
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
विनाकारण आक्रमकता दाखवू नका. नवीन लिखाण वाचनाचे काम चालू करा. तुमच्यातील क्रियाशीलता वाढीस लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल. मेहनत फळाला येईल.
वृषभ
बोलण्यात गोडवा ठेवाल. घरगुती जबाबदारी वाढू शकते. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. कुटुंबासाठी वेगळा वेळ काढावा. व्यावसायिक निर्णय फलद्रुप होताना दिसतील.
मिथुन
दिवस मनाप्रमाणे घालवाल. घरात आनंदी वातावरण असेल. बौद्धिक बाजू चमकेल. हातातील अधिकार ठामपणे बजावा. भाग्याची चांगली साथ मिळेल.
कर्क
दिवसाची सुरुवात छान होईल. जोडीदाराच्या सल्ल्यावर विचार करावा. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. नवीन ओळखी मन प्रफुल्लित करतील. आळस दूर सारावा.
सिंह
आपले स्वत्व राखून वागाल. मुलांबरोबर चांगला वेळ जाईल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. वेळेचा सदुपयोग करा.
कन्या
बोलण्याने लोकसंग्रह जमवाल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. मानसिक तणाव वाढू शकतो. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. प्रलंबित येणी प्राप्त होण्याचे संकेत.
तूळ
दिवसाची सुरुवात उत्साहात करा. छोटे प्रवास घडतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. तुमच्या कौशल्याचे कौतुक केले जाईल. घरातील ज्येष्ठांची संवादात्मक चर्चा करावी.
वृश्चिक
बोलतांना शांत व विचारपूर्वक बोला. धार्मिक कामासाठी पैसे खर्च कराल. आपल्या मनातील विचार योग्य पद्धतीने बोलून दाखवा. आर्थिक व्यवहार सर्व बाबी तपासून करावेत. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
धनू
जुन्या विचारांना थारा देऊ नका. बोलण्यात गुप्तता पाळावी. आक्रमक किंवा कटू शब्द टाळा. घरातील वातावरण कलुषित होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराशी मोकळेपणाने चर्चा करा.
मकर
कामातून समाधान लाभेल. तुमचे मनोधैर्य उंचावेल. अधिकार्यांकडून उत्तम सहकार्य लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल. जुने वाद मिटण्याची शक्यता.
कुंभ
उतावीळपणे वागू नका. हातातील कामे यशस्वी होतील. जुगारातून धनलाभ संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावे. संशोधन पुढे नेण्यास उत्तम काळ.
मीन
बोलण्याचा आवेश इतर कामांसाठी वापरा. लोक तुमचा सल्ला मागतील. घरातील वातावरण खेळकर राहील. जुनी गुंतवणूक कामी येईल. जोडीदाराचे व्यावहारिक चातुर्य दिसेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



