अहमदनगर

डुप्लिकेट कागदपत्रांच्या आधारे परप्रांतीय कामगारांची सुपा मतदार यादीत नोंद?

~

पारनेर प्रतिनिधी/ दत्ता ठुबे :-

डुप्लिकेट कागदपत्रांच्या आधारे काही राजकीय लोकांनी परप्रांतीय कामगारांची मतदार यादीत नोंद केल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश पवार यांनी केला आहे

पारनेर तालुक्यात सुपा औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय कामगारांची काही राजकीय लोकांकडून स्वतः च्या राजकीय फायद्यासाठी सुपा गावच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करत आहे ,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परप्रांतीय लोकांची कसल्याही प्रकारचे व्हेरिफिकेशन न करता फक्त कार्ड चा समोरील बाजुचा फोटो घेऊन ऑनलाईन पद्धतीने BLO सोबत आर्थिक व्यवहार करुन सुपा ग्रामपंचायत मतदार यादीत मोठ्या संख्येने नोंद केल्या आहे

हा गंभीर प्रकार असल्यामुळे याची ग्रामपंचायत मध्ये चौकशी केली असता परप्रांतीय लोकांना कोणत्याही प्रकारचे रहिवासी दाखला दिला नसल्याचे सरपंच व ग्रामसेवक यांनी सांगितले तसेच सुपा ग्रामपंचायत मध्ये परप्रांतीय लोकांची मतदार यादी मध्ये नोंद न करण्याबाबत ठराव झाला असल्याचे सरपंच व ग्रामसेवक यांनी सांगितले

त्यामुळे बी.एल.ओ.ने कशाच्या आधारे नोंद केली याबाबत पारनेर तहसीलदार यांना निवेदन दिले असून निवडणूक शाखेकडून याबाबत लिखीत स्वरुपात खुलासा करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी केली आहे

या परप्रांतीय लोकांना डुप्लिकेट कागदपत्रे काढण्यासाठी मदत करणारे संबंधितअधिकारी,बी.एल.ओ. कॉम्पुटर चालक,आधार केंद्र चालक ज्यांनी परप्रांतीय लोकांना डुप्लिकेट कागदपत्रांच्या आधारे नोंद करण्यासाठी मदत केली त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी तहसीलदार यांचे कडे केली असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी सांगितले

या गंभीर गोष्टीचा गांभीर्याने विचार करुन आठ दिवसांत कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसील कार्यालयात मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येणार असल्याचे पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button