कृषीमहाराष्ट्र

शिव पाणंद शेतरस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी कंपन्यांचा सीएसआर सक्तीचा करा- शरद पवळे

राज्याचे उद्योग सचिव महाराष्ट्र राज्य यांना डॉ. पी. अन्बलगन यांना दिले निवेदन

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी :

-महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून राज्यातील तमाम शेतकऱ्यांचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित असलेला शेतरस्त्यांचा ज्वलंत प्रश्न आहे

यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपूरक व्यवसाय बंद पडणे,फौजदारी स्वरूपांच्या घटना,शेतजमीनी कवडीमोल किंमतीने विकणे, जमीनी पडीक पडणे, शेतमालासह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकासान यामुळे शेतकऱ्यांचे शारिरीक मानसिक आर्थिक नुकसान होत असल्यामुळे शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून प्रशासकीय न्यायालयीन जनजागृती जनआंदोलनाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण सरकार चे लक्ष वेधण्याचे काम राज्यभर सुरू असून सरकारने चांगले निर्णय घेवून चळवळीची दखल घेतली आहे

राज्यभरात शेतरस्त्यांचे सीमांकन, मोजणी होवून हद्द निश्चित झाल्यानंतर त्याला तातडीने मजबुतीकरण करण्याची आवश्यकता असुन सदर कामासाठी महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचा सीएसआरचा निधी सक्तीने शेतरस्त्यांसाठी देण्याच्या तातडीने सुचना देवुन महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या शेतीचा श्वास खुला करा वा

समृद्ध शेतकरी व समृद्ध महाराष्ट्राच स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी डॉ. पी. अन्बलगन उद्योग सचिव महाराष्ट्र राज्य यांना सीएस आरचा फंड राज्यातील कंपण्यांना सक्तीचा करण्याची मागणी केली.

– भारत हा कृषीप्रधान देश समजला जात असुन औद्योगिकीकरणासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमीनी दिल्या राज्यात कंपन्याचा विकास झाला ही आनंदाची बाब आहे पण कृषीची प्रगती साधण्यासाठी, दळणवणासाठी शेतीला दर्जेदार शेतरस्त्यांची आवश्यकता असुन अतिवृष्टीमुळे शेतीचे कच्चे रस्ते नष्ट होवून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असुन राज्यातील कंपन्यांचा सीएसआरचा फंड शेतरस्त्यांच्या मुजबुतीकरणासाठी मिळाल्यास ग्रामविकासाला मोठी चालना मिळेल

– शरद पवळे

शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button