अकोल्यात शिक्षकांना मूल्यवर्धन शिक्षणाचे प्रशिक्षण!

एस. के. जाधव /प्रतिनिधी दि. 3
अकोले तालुक्यातील पहिली ते आठवी वर्गाच्या शिक्षकांचे तीन दिवसाचे मूल्यवर्धन प्रशिक्षणाला मॉर्डन हायस्कूल अकोले येथे आज सुरुवात झाली.
शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन, पूणे या संस्थेने सदर अभ्यासक्रम तयार केला असून महाराष्ट्र शासनाने सर्व शाळमध्ये राबविण्याची प्रक्रिया चालू केली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये जी मूल्य रुजवायची आहेत, ती रुजवण्यासाठी त्यांना आवड निर्माण करणे हे शिक्षकांचे काम आहे . विद्यार्थ्यांमध्ये एखादी सत्य गोष्ट ठसवणे, कृतीयुक आणि चर्चात्मक पद्धतीने अध्ययन – अध्यापन करणे. हे शिकवायचे आहे. यासाठी महात्मा गांधीजींचे विचार, तत्त्व व सामाजिक दृष्टीकोन, गरज ह्या गोष्टी पटवून सांगीतल्या.
सदर उपक्रम घेताना चर्चा करायची, कृतितून शिक्षण द्यायचे आहे. नुसते पाठयपुस्तक शिकवून अभ्यासक्रम संपवायचा नाही. तर मूल्य शिक्षण द्यायचे आहे. राष्ट्रीय शैक्षणीक धोरणानुसार महाराष्ट्र शासनाने आराखडा निर्माण केला आहे. तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे हे शिक्षकांचे कार्य आहे. पहिल्या सत्रात मूल्यवर्धन कार्यशाळेचा परिचय,कार्यशाळेचा उद्देश, मूल्य शिक्षणाचा परिचय करून दिला. त्याच बरोबर शिक्षकांनी प्रशिक्षणाचे नियम अटी लिहून दाखवले. तसेच श्री अर्जुन तळपाडे व श्री युवराज तळपे यांनी एकमेकांची ओळख करून दिली.

दुसऱ्या सत्रात सुलभक श्री नारायण चौधरी सरांनी मूल्यवर्धन प्रत्यक्ष पद्धती, अंतर्भूत मूल्य, अभ्यासक्रमाची उद्दीष्टये, क्षमता आणि अध्ययन निष्पती हे सांगीतले तसेच मूल्यवर्धन विद्यार्थी उपक्रम पुस्तिका आणि शिक्षक उपक्रम पुस्तिका कशी वापरायची हे सांगीतले. त्याच बरोबर ” मामाचे घर आहे माडीचे, मामीला वेड आहे साडीचे”. हे बडबड गीत म्हणून दाखवले. श्री विलास सावंत सरांनी उपस्थित प्रशिक्षणार्थीचे आभार मानले.