इतर

व्ही व्ही पोपरे यांची बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फिलोशिप या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड

एस के जाधव

कोकणेवाडी ता अकोले दि 4 – आदिवासी समाजसेवक डॉ. व्ही व्ही पोपेरे यांची बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कारासाठी निवड झाली आहे

साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात गावोगावी खेड्यापाड्यावर जाऊन जनजागृती अभियान राबवणे, अंधश्रद्धा निर्मूलन, बेरोजगाराबाबत मार्गदर्शनकरणे, शासकीय विविध योजनांची माहिती देणे, महिलांकरिता ब्युटी पार्लर प्रशिक्षण मोफत देणे, मेणबत्ती प्रशिक्षण मोफत देणे, अगरबत्ती प्रशिक्षण मोफत देणे, घरकुल योजनेचा लाभ देणे, एस टी महामंडळाच्या बस सेवा सुरू करणे, नेहरू युवा केंद्र मार्फत जनजागृती अभियान राबवणे, सूक्ष्म लघु उद्योग केंद्र भारत सरकार यांचे विविध उपक्रम गरजू व सुशिक्षित बेरोजगार यांच्यापर्यंत पोहोचविणे व ते कृतीत राबवणे,राष्ट्रीय स्तरावर पुस्तकांची निर्मिती करून आपली परिकल्पना पुस्तकाच्या स्वरूपामध्ये शासनास सादर करणे,असे विविध उपक्रम गेले अनेक वर्षापासून ते करत आहेत

नुकताच भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली भारत यांच्यातर्फे दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फिलोशिप या राष्ट्रीय पुरस्कारासाठी पोपरे यांची निवड झालेली असून अकोले तालुक्याला ही बाब कौतुकास्पद आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार दिल्लीत दिला जाणार आहे. डॉ.पोपेरे हे बदलापूर ठाणे येथील रहिवासी ते त्यांचे मूळ गाव मु. पोपेरेवाडी (कोंभाळणे ता.अकोले) जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत. ते कामानिमित्त ठाणे बदलापूर येथे राहत आहेत तसेच ते नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी म्हणून सध्या काम पाहत आहेत. ते सामाजिक क्षेत्रात व साहित्य क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देत आहेत. त्यांचे कार्य अभिमानास्पद व उल्लेखनीय असे असल्याने त्यांना भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली भारत यांच्यामार्फत दिल्ली येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे डॉ.पोपेरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जातं आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button