इतर

सटाणा येथे शिव जयंतीनिमित्त भव्य “शिवगर्जना” सोहळा संपन्न

नाशिक दि 19 सटाणा येथे धर्मरक्षक प्रतिष्ठान व DR ग्रुप, सटाणा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित भव्य “शिवगर्जना” सोहळा अत्यंत उत्साहात व भव्य स्वरूपात पार पडला.

या ऐतिहासिक कार्यक्रमास १०,००० ते १२,००० पेक्षा अधिक शिवभक्तांनी उपस्थित राहून शिवप्रेमाचा अभूतपूर्व जागर निर्माण केला.

बाळ गोपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घेऊन मनात बिंबवणण्याचा मानस केला. कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा संपूर्ण इतिहास जिवंत स्वरूपात साकारण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांना इतिहासाचे रोमांचक दर्शन घडले.

यावेळी मा. दिलीपजी बोरसे — विधानसभा सदस्य, बागलाण,मा. अविनाशजी भामरे (विक्रीकर आयुक्त, मुंबई), मा. उत्तमराव दत्तात्रेय सोनवणे (पोलीस उपायुक्त), मा. यशवंतजी बाविस्कर (उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव ग्रामीण), मा. विजयजी पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई), मा. महेशजी शेलार (प्रांताधिकारी, बागलाण) व मा. योगेशजी पाटील (पोलीस निरीक्षक, सटाणा) उपस्थित होते. तसेच निवृत्त वरिष्ठ अधिकारी, शैक्षणिक व संस्थात्मक क्षेत्रातील मान्यवर मा. सुनिलजी ढिकले (अध्यक्ष, मराठा विद्या प्रसारक समाज), मा. नितीनजी ठाकरे (सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज), मा. सौ. शालिनीताई अरुण सोनवणे (संचालक, सौ हर्षदा राहुल सोनवणे, नगराध्यशा, सटाणा उपस्थित होते. उद्योग, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मा. विलासजी शिंदे (संचालक, सह्याद्री ग्रुप), मा. संदीपजी सोनवणे (संचालक, कडकनाथ अॅग्रो वर्ल्ड) व मा. उद्धवजी आहेर (संचालक, आनंद अॅग्रो) यांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या सोहळ्यात शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र, शौर्यगाथा व स्वराज्याचे विचार प्रभावी पद्धतीने सादर करून बागलाणवासीयांच्या मनात राष्ट्रभक्ती व स्वाभिमानाची प्रेरणा पेरण्यात आली. विशेष आकर्षण म्हणून घेण्यात आलेल्या टॉर्च शोने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या उत्साहाने भारावून गेला. शिवाजी महाराजांच्या गाण्यांवर सर्व शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला.

कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा, नियोजन व सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी धर्मरक्षक प्रतिष्ठान व DR ग्रुप, सटाणा यांनी अत्यंत काटेकोरपणे पार पाडली. “शिवाई प्रस्तुत शिवरायांचे आठवावे रूप ” या सादरीकरणातून कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवंत रूप अत्यंत प्रभावीपणे साकारले, ज्यामुळे उपस्थितांना ऐतिहासिक क्षणांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

या भव्य सोहळ्यामुळे बागलाण परिसरात शिवचरित्राचा जागर निर्माण होऊन स्वराज्याचे विचार जनमानसात अधिक दृढ झाले असून हा कार्यक्रम एक ऐतिहासिक ठसा उमटवणारा ठरला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button