अकोल्यात महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन

अकोले (प्रतिनिधी)
अकोले शहरात सावित्रीबाई फुले वाचनालय अकोले व अकोले तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले चौकात महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी नगरपंचायतीचे मा.नगरसेवक, अगस्ति पतसंस्थेचे संचालक प्रमोद मंडलीक म्हणाले महात्मा फुलेंनी शैक्षणिक, सामाजिक वंचितांसाठी मोठे योगदान दिले आहे. महात्मा जोतिराव व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे १ जानेवारी १८४८ रोजी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरु केली आणि स्त्री मुक्तीची पहाट झाली हा क्षण इतिहासात नोंदला गेला.
तसेच त्याकाळी महात्मा फुले यांनी मुंबई, पुणे आदींसह अनेक शहरात मोठमोठ्या इमारतींचे केलेले बांधकाम आजही चांगल्या स्थितीत दिमाखदार उभे आहेत. आज शिक्षणाची काय स्थिती परिस्थिती आहे शिक्षण व्यवस्थेची आपण पाहत आहोत शिक्षणाचा धंदा, महागडे शिक्षण सर्व सामान्यांना न परवडणारे झाले आहे.
याप्रसंगी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे म्हणाले, की शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी करणारे आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे आणि आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचणाऱ्या महात्मा फुले यांना जनतेने "महात्मा" पदवी बहाल केली. त्यांचे विचार आणि कार्य आपना सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील असे त्यांनी सांगितले.यावेळी ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलीक, तालुका अध्यक्ष दत्ता शेणकर, बबनराव तिकांडे, साई डेअरीचे संचालक केशवराव नवले, प्रवरा पतसंस्थेचे मा.चेअरमन वसंतराव बाळसराफ, रामदास पांडे, कारभारी बंदावने, प्रसाद भालेराव, राम रुद्रे, दिलीप मंडलिक, किरण चौधरी, दत्ता ताजणे, रमेश नाईकवाडी, भाऊसाहेब नाईकवाडी, बाळासाहेब भांगरे, सुरेश गायकवाड, सुभाष मंडलिक, अनिल गायकवाड,किसन गायकवाड, रमेश बाळसराफ, सुदाम मंडलीक, सखाराम खतोडे आदी उपस्थित होते सुत्र संचालन रामदास पांडे यांनी केले किसन गायकवाड यांनी आभार मानले.




