सेवा समिती संगमनेर करांच्या विकासासाठी कटिबद्ध राहील– माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर सेवा समितीची अभूतपूर्व भव्य प्रचार रॅलीने सांगता
संगमनेर (प्रतिनिधी)--ही निवडणूक संगमनेर तालुक्याच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची आहे. संगमनेर तालुक्यातील जनता कधीही इतरांपुढे लाचार होणार नाही. विकास कामे करत राहू याचबरोबर रेल्वे सुद्धा खेचून आणू असे सांगताना संगमनेर मध्ये सुरू झालेली अमली पदार्थांची तस्करी त्या अडून असलेले टोल नाके बंद करण्यासाठी संगमनेरकर एकवटले असून आगामी काळामध्ये आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सर्व उमेदवार कटिबद्ध रहातील असा विश्वास वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
संगमनेर शहरात सेवा समितीच्या वतीने भव्य प्रचार रॅली झाली या प्रचार रॅलीची सांगता लालबहादूर शास्त्री चौक येथे झाली. या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा आ डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, ॲड माधवराव कानवडे, उत्कर्षा ताई रुपवते रणजीतसिंह देशमुख, अमर कतारी, संजय फड, सोमेश्वर दिवटे दिलीपराव पुंड विश्वासराव मुर्तडक यांच्यासह सेवा समितीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर शहरात आजची रॅली ही अभूतपूर्व आणि ऐतिहासिक झाली जनतेचा मोठा उत्साह आहे. सेवा समितीचे सर्व उमेदवार सक्षम असून आपल्या सेवेसाठी कायम कटिबद्ध राहतील.
ही निवडणूक संगमनेर तालुक्याच्या स्वाभिमानाचे आणि अस्मितेची आहे. संगमनेर तालुका कधीही लाचार नव्हता. आणि कधी लाचार होणार नाही .माझी विरोधकांना सुद्धा आव्हान आहे कुणाची बाहेरच्यांची लाचारी पतकरू करू नका .आपण स्वाभिमानी आहोत. मागील एक वर्षांमध्ये तालुक्यात असुरक्षितता वाढली आहे.अमली पदार्थांची तस्करी, दादागिरी वाढली आहे. टोल वसुली सुरू आहे. हि टोल वसुली आपल्याला थांबवायची आहे .अमली पदार्थ बंद करायचे आहेत. रेल्वे पळवली जरी असली तरी ती खेचून आणू असे सांगताना विकास कामे कायम राहतील याकरता सर्व नागरिकांनी एकजुटीने सेवा समितीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा असे आवाहन केले.
तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकास करण्याची धमक आमच्यामध्ये आहे. बाहेरचे लोक संगमनेर मधील काही लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवतात. त्यांचा संगमनेरच्या प्रगतीवर डोळा आहे .नाशिक रेल्वे त्यांनी पळवली आहे आता संगमनेर शहरातील निळवंडे चे पाणी पळवण्याचा त्यांचा डाव आहे. मागील तीन महिन्यात तीन सी ओ आले एक सी ओ तर दोन दिवसा करता आला होता. त्यांना विकास करायचा नाही तर ना हरकत पत्र घेण्याकरता नगरपालिका ताब्यात हवी आहे.
परवाच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी एमआयडीसी ऑनलाईन मंजूर केली. संगमनेर मध्ये शंभर एकरावर सहकारी एमआयडीसी असून चारशे कंपन्या आहेत. त्यामध्ये 10 हजार कर्मचारी काम करत असून त्याचे संस्थापक लोकनेते बाळासाहेब थोरात आहेत. अर्धवट माहितीच्या आधारे उद्योग मंत्र्यांनी बोलू नये असे ते म्हणाले तर आगामी काळामध्ये भूमिगत गटारे पूर्ण करून रस्ते काँक्रिटीकरण करायचे आहे. याचबरोबर धुळमुक्त शहर, कचरा व्यवस्थापन, कार्यक्षम ऑनलाईन ऑफिस अशा सर्व योजना राबवायच्या असून सर्व नागरिकांनी आपल्या नातेवाईक जवळच्या सर्वांचे मतदान सेवा समितीच्या उमेदवारांना करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उत्कर्षा ताई रुपवते, माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनीही मनोगत व्यक्त केली.
संगमनेर शहरातून झालेल्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला या रॅलीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते जागा कमी पडली होती संगमनेर शहर सेवा समितीच्या जयजयकाराने दुमदुमून गेले.
इंदिरानगर मधील नागरिकांच्या नावावर सातबाराइंदिरानगर मधील गट नंबर 106 मधील आरक्षणाबाबत आपण सातत्याने पाठपुरावा केला. आजच सर्व नागरिकांच्या नावावर सातबारे देण्याचे काम सुरू झाले असून विकासाचे काम करण्याची धमकी बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे बाकीचे मात्र टक्केवारी मध्ये गुंतले असल्याची टीका त्यांनी केली
.100 एकरावर सहकारी एमआयडीसी
उद्योग मंत्र्यांनी अपूर्ण माहितीच्या आधारे उपमुख्यमंत्र्यांना एमआयडीसी देऊ असे सांगितले .शासकीय एमआयडीसी साठी सुद्धा मी पाठपुरावा केला आहे. येथे एमआयडीसी आहे त्यामध्ये 400 उद्योग असून सुमारे दहा हजार लोक काम करत आहेत आम्हाला अजून शासकीय एमआयडीसीची गरज आहे आणि त्याचा पाठपुरावा मी करतो. अपूर्ण माहितीच्या आधारे ऑनलाइन भूल थापांना संगमनेरकर बळी पडणार नाही असे आमदार सत्यजित तांबे म्हणाले.



