सालाबादप्रमाणे या वर्षीही राजूर (ता.अकोले जिल्हा अहिल्यानगर ) येथे डांगी व सुधारित देशी जनावरांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे
राजूर ग्रामपंचायत, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर तसेच पशुसंवर्धन विभाग जि.प. अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन पिंपरकणे रोड, राजूर येथे ६ ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान भरविण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात अहिल्यानगर, नाशिक व ठाणे जिल्ह्यातील जातीवंत डांगी व सुधारित जनावरांचा सहभाग राहतो, शेतकरी व व्यापारी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो
. गायी, वळू, कालवडी, खोड व बैलजोड्यांची खरेदी-विक्री होत असून खरेदी- विक्रीसाठी जनावरांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती आयोजकांनी दिली.
स्पर्धेसाठी प्रत्येक जनावरामागे २०० रुपये नोंदणी शुल्क असून ६ व ७ डिसेंबर रोजी नोंदणी होईल. ८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते २ या वेळेत निवड प्रक्रिया होणार असून ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बक्षीस वितरण समारंभ होईल. उत्कृष्ट व निवडक जनावरांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात येतील. आ. डॉ. किरण लहामटे व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी सीताराम गायकर असतील.
राजुर येथील प्रदर्शनात अहिल्या नगर,नाशिक,पुणे, ठाणे या जिल्ह्यातून असंख्य शेतकरी,व्यापारी येत असतात या ठिकाणी खरेदी विक्रीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते यात शेतकऱ्यांची आर्थिक होण्याची शक्यता ही असते यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे तसेच तीन पट्टी,जुगार, मटका, अवैध देशी विदेशी दारू यासारख्या अवैद्य व्यवसायावर राजूर पॉलिसांनी वेळीच कारवाई करावी तसेच प्रदर्शनात येणाऱ्या पाळणा व्यवसायिकांकडून उंची व नियमांचे पालन व्हावे तीन पत्त्या जुगारासारखे खेळ बंद ठेवावे अशी मागणी आरपीआयचे तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी केली आहे
परिसरातील झाडांचे व ट्रीगार्डचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच व्यावसायिकांनी दुकाने लावण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन सरपंच पुष्पाताई निगळे, उपसरपंच संतोष बनसोडे व ग्रामविकास अधिकारी राकेश पाटील यांनी केले.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच गणपत देशमुख, माजी उपसरपंच गोकुळ कानकाटे, ग्रामपंचायत सदस्य सारिका वालझाडे, अतुल पवार, संगीता मैड, ओंकार नवाळी, हर्षल मुतडक, रोहिणी माळवे, रोहिणी देशमुख, प्रमोद देशमुख, संगीता जाधव, संगीता मोहंडुळे, सुप्रिया डगळे, राम बांगर, विमल भांगरे, लता सोनवणे व ग्रामपंचायत कर्मचारी प्रयत्नशील आहेत.