प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, पारनेर केंद्राचा अभ्यास दौरा संपन्न

दत्ता ठुबे /पारनेर दि. ३०,
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, पारनेर केंद्राच्या ४१ सहपरिवार साधकांनी नुकताच पुणे येथील जगप्रसिद्ध आध्यात्मिक केंद्र ‘जगदंबा भवन’ येथे एक महत्त्वपूर्ण अभ्यास दौरा आयोजित केला होता. केंद्राच्या संचालिका साधना दिदी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा दौरा यशस्वीरित्या पार पडला,
या मध्ये पारनेरमधील अनेक साधक सहभागी झाले होते.
या अभ्यास दौऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ब्रह्माकुमारी परिवारातील ज्येष्ठ सदस्य दशरथ भाई यांचे साधकांना लाभलेले अनमोल मार्गदर्शन. ज्यांनी स्वतः प्रजापिता ब्रह्मा बाबांचे पालना पोषण निर्देश अनुभवले आहे, अशा दशरथ भाई यांनी साधकांना आध्यात्मिक आणि ईश्वरीय ज्ञाना विषयी सखोल माहिती दिली. त्यांनी सहज आणि सोप्या भाषेत ईश्वरीय ज्ञानाचे महत्त्व समजावून सांगितले, ज्यामुळे उपस्थित साधकांच्या मनात नवचैतन्य निर्माण झाले.

यावेळी दशरथ भाई यांनी पुणे येथील जगदंबा भवन या आध्यात्मिक केंद्राच्या कार्याची सखोल माहिती साधकांना दिली. ब्रह्माकुमारीज संस्था केवळ अध्यात्मिक ज्ञानच नाही, तर समाजसेवा आणि नैतिक मूल्यांच्या स्थापनेसाठी कशा प्रकारे कार्यरत आहे, हे त्यांनी विशद केले. हे भवन संस्थेच्या महत्त्वाच्या कार्याचे आणि विश्व परिवर्तनाच्या ध्येयाचे एक प्रेरणास्थान आहे.साधना दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभ्यास दौऱ्यामुळे साधकांना ब्रह्माकुमारीज संस्थेच्या मूळ कार्याची आणि तत्वांची जवळून माहिती मिळाली.
दशरथ भाई यांच्या प्रेरणादायक शब्दांमुळे साधकांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आत्मिक शांती ची भावना वाढीस लागली. या दौऱ्यामुळे साधकांना आपल्या आध्यात्मिक प्रवासात पुरुषार्थ करण्याची आणि दृढनिश्चयाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे. पारनेर केंद्रातील साधकांना संस्थेच्या वैश्विक कार्याची व्याप्ती समजावी आणि त्यांना आध्यात्मिक ज्ञानाच्या आचरणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने करण्यात आले होते. हा दौरा पारनेर केंद्रातील साधकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अविस्मरणीय अनुभव ठरला. या अभ्यास दौऱ्यासाठी देवराम भाई, आवारी सर, राम भाई,दिलीप भाई, लक्ष्मण भाई, सुभाष भाई, लता माता, अरुणा माता, रवी भाई, संतोष भाई आदींनी परिश्रम घेतले.



