इतर

राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अतुल भाऊ माने यांची निवड .

पारनेर तालुक्यात माने यांच्या निवडीचे स्वागत .

दत्ता ठुबे / पारनेर दि 4

पारनेर तालुका भाजपाचे उपाध्यक्ष अतुल भाऊ माने यांची राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली . या समितीत माने यांच्या या निवडीमुळे पारनेर तालुक्याला प्रथमच संधी प्राप्त झाली आहे त्यांच्या निवडीचे पारनेर तालुक्यात जल्लोष साजरा करण्यात आला आहे .
अतुल भाऊ माने यांचे पुणे , पिंपरी चिंचवड व पारनेर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्य पाहता त्यांची राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली . राष्ट्रीय अध्यक्ष विकास यदुवंशी व प्रदेशाध्यक्ष किशोर मनोहर लखन , महाराष्ट्र राज्य युवा मोर्चाचे अध्यक्ष किशोर पवार यांनी माने यांच्या वर जिल्हा उपाध्यक्ष पदाची धुरा सोपवली .


या निवडी प्रसंगी बोलताना युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष किशोर पवार यांनी सांगितले की , अतुल मानें सारखे कार्यकर्ते पक्षाचे व संघटनेचे काम प्रामाणिकपणे आहोरात्र करत असतात व अशा कार्यकर्त्यांना संधी‌ ही मिळालीच पाहिजे , समितीच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या लोकहिताच्या योजना समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काम राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे प्रत्येक कार्यकर्ते करत आहेत व अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी जबाबदारी आम्ही अतुल भाऊ माने यांना देत आहोत व ती जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडतील , अशी आम्हाला खात्री आहे , म्हणूनच आम्ही अळकुटी सारख्या ग्रामीण भागातील निष्ठावंत कार्यकर्त्यावर जबाबदारी सोपवली आहे , असे प्रदेशाध्यक्ष पवार यांनी गौरवोदगार काढले आहेत .
या निवडी प्रसंगी बोलताना नूतन जिल्हा उपाध्यक्ष अतुल भाऊ माने यांनी राष्ट्रीय अध्यक्ष विकास यदुवंशी , प्रदेशाध्यक्ष किशोर लखन व युवा मोर्चाचे अध्यक्ष किशोर पवार यांचे आभार मानले व दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल , येणाऱ्या काळात सामाजिक कार्य व सरकारच्या योजनांचा प्रसार , प्रचार व संघटन वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहीन , असे माने यांनी सांगितले .
भाजपाचे निष्ठावंत व स्पष्टवक्ते कार्यकर्ते म्हणून अतुल भाऊ प्रसिद्ध आहेत , त्यांना प्रदेशाध्यक्ष किशोर लखन , अहिल्यानगर शहराध्यक्ष विनोद काशीद यांनी अहिल्यानगर येथे नियुक्तीपत्र सुपूर्द केले . यावेळी युवा मोर्चाचे कान्हुर व जवळा मंडलाचे अध्यक्ष संग्राम पावडे , भाजपा चे मंडलाचे सरचिटणीस तुकाराम भाऊ येवले , सदस्य भागचंद पवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या निवडीचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील , माजी खा . सुजय विखे पाटील , विश्वनाथ कोरडे , सचिन वराळ व आदींनी स्वागत केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button