राजुर येथील प्रदर्शनात शेतकऱ्यांना पाचशे अपघात विमा पॉलिसीचे वाटप

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील राजुर येथे गेल्या पन्नास वर्षापासून शेतकऱ्यांचे व जनावरांचे विशेषत डांगी जातीच्या जनावरांचे प्रदर्शन भरत असतेप्रदर्शनामध्ये शेती अवजारे व विविध पिकांचे प्रदर्शन भरले होते यासाठी ठाणे पुणे नगर नाशिक या जिल्ह्यातून शेतकरी उद्योजक या प्रदर्शनात आले होते तसेच जनरल इन्शुरन्स कंपनी यांचे वतीने आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी क्षत्रिय कार्यालय क्रमांक एक व दोन यांचे वतीने प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांसाठी पाचशे विमा पॉलिसीचे वाटप केले जाते या अपघात विमा पॉलिसीमुळे गरीब कुटुंबातील शेतकरी बांधवांना त्याचा लाभ होतो आपत्तीग्रस्त झाला तर त्याच्या कुटुंबाला ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून एक लाख रुपयाची पॉलिसीची मदत दिली जाते हे काम केल्या वीस वर्षापासून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली मुंबई विभाग व सह्याद्री आदिवासी सेवा संघ मुंबई यांचे वतीने या पॉलिसीचे वाटप केले जाते यावर्षी माजी आमदार वैभवराव पिचड व पुणे जिल्हा माजी अध्यक्ष देवराम शेठ लांडे आदिवासी वादळ दिलीपराव भांगरे माजी सरपंच गणपतराव देशमुख भोईर साहेब एम एस ई बी राजुर ग्रामपंचायत सदस्य बनसोडे साहेब लालू भांगरे दिगंबर नवाले भिवा भाडकोळी यांनी अधिक परिश्रम घेऊन पॉलिसी वितरणाचे काम केले

यावेळी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे डिव्हिजनल मॅनेजर रमेश सावतकर मा. प्रशासकीय अधिकारी रामनाथ भोजने विलास तुपे , सुनील गीते , शांताराम काळे भास्कर येलमामे ,गंगाराम धिंदळे, सुनील सोनार यांच्या उपस्थितीत राजूर येथे पॉलिसी वितरण व स्टॉलचे उद्घाटन मा आ वैभवराव पिचड ,मा अध्यक्ष पुणे देवराम शेठ लांडे यांच्या शुभहस्ते पार पडले

हा उपक्रम गेल्या २० वर्षांतपासून स्वर्गीय मधुकरराव पिचड यांच्या संकल्पनेतून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने परिषदेच्या वतीने संपूर्ण राज्यात राबवला जातो अशी माहिती रामनाथ भोजने यांनी दिली



