इतर

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अहिल्यानगर जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न



जिल्हाध्यक्षपदी श्री कृष्णा साठे यांची तर श्री आकाश कदम यांची जिल्हा सचिवपदी निवड

अहिल्यानगर प्रतिनिधी
भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अहिल्यानगर जिल्हा अधिवेशन अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडले.

अधिवेशनाची सुरुवात प्रतीमापूजन, श्रमिक गीत व “भारतीय मजदूर संघ जिंदाबाद” या जोशपूर्ण घोषणांनी करण्यात आली. अधिवेशनात संघाचे केंद्रीय संघटन मंत्री श्री. उमेश आनेराव यांनी मार्गदर्शन करताना कंत्राटी वीज कामगारांना नोकरीत स्थैर्य, कंत्राटदारविरहित रोजगार व समान कार्य–समान वेतन मिळावे, यासाठी संघ आग्रही असल्याचे स्पष्ट केले. या मागण्यांसाठी कायदेशीर लढा तसेच आवश्यक असल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कामगारांनी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रदेश सचिव श्री सचिन पाटील यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत व परिचय करून अधिवेशनाचे प्रभावी प्रास्ताविक सादर केले. अधिवेशनात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील कंत्राटी वीज कामगारांच्या गंभीर समस्या, अडचणी व त्यावरील ठोस उपाययोजनांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.
जिल्ह्यातील संघटनात्मक स्थिती, सदस्य नोंदणी व वर्गणी, सुरू असलेली न्यायालयीन प्रकरणे तसेच देणगी बाबत काटेकोर व पारदर्शक अंमलबजावणी करण्याचा ठाम निर्णय अधिवेशनात घेण्यात आला.
वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित थेट रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या नोकरीत स्थैर्य व संरक्षण देण्यात यावे.
कंत्राटी कामगारांना “समान कार्य – समान वेतन” या तत्त्वानुसार वेतन, भत्ते व सर्व सेवा सुविधा देऊन सामाजिक व आर्थिक न्याय सुनिश्चित करण्यात यावा. या दोन्ही ठरावांना उपस्थित प्रतिनिधींनी जोरदार पाठिंबा देत एकमताने मंजुरी दिली.


यावेळी जिल्ह्याची नवीन संघटनात्मक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. श्री कृष्णा साठे यांची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघटनेतील पद हे सन्मान नसून जबाबदारी आहे, या भूमिकेचा निर्धार व्यक्त करत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी निष्ठेने, संघटितपणे व संघर्षशील पद्धतीने कार्य करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुजित उदरभरे,श्री अनिल नजन मार्गदर्शन करताना वीज क्षेत्रातील कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या अन्याया विरोधात संघटित व तीव्र लढा उभारण्याचे आवाहन केले. भारतीय मजदूर संघाच्या विचारधारेनुसार संघटन, संघर्ष व संवाद या मार्गाने कामगारांचे प्रश्न सोडविले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
या अधिवेशनात मंजूर झालेले ठराव व निर्णय लवकरच संबंधित प्रशासन, वीज वितरण कंपन्या व शासनापर्यंत पोहोचवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संघटनेच्या वतीने पुढील संघर्षात्मक दिशा ठरविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.


या अधिवेशनात प्रास्ताविक श्री सचिन पाटील यांनी केले.कार्यक्रमाध्यक्ष श्री सुजित उदरभरे (भारतीय मजदूर संघ, अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष),संघटनेचे केंद्रीय संघटनमंत्री श्री उमेश आनेराव व वीज कामगार संघटनेचे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष श्रीअनिल नजन,जिल्हा सचिव गणेश कुंभारे,दुधाने साहेब,संघटनेचे उपाअध्यक्ष श्री अतिश लांडगे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी संतोष शेळके, दीपक चौधरी, सोनवणे,विनायक आगरे, धनाजी चोरमले , बाळू बहिर , जगताप, कोलते,जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या अधिवेशनास 3०० पेक्षा अधिक कंत्राटी वीज कामगारांची लक्षणीय उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button