इतर

नाशिक – पुणे रेल्वे मार्गात बदल झाला तर समृद्धी महामार्ग रोखू रेल्वे कृती समितीचा इशारा

नाशिक -पुणे रेल्वे मार्ग अकोल्यातून गेला पाहिजे 

…….तर 31 जानेवारीला समृद्धी महा मार्गावर रस्ता रोको आंदोलन

 रेल्वे च्या मागणीसाठी कोतुळ  येथे विद्यार्थी व नागरिक  रस्त्यावर!

कोतुळ प्रतिनिधी

नाशिक -पुणे रेल्वे मार्ग हा अकोल्यातून गेला पाहिजे या मागणीसाठी अकोले तालुका रेल्वे कृती समिती च्या वतीने आज  शुक्रवारी  कोतूळ (ता  अकोले ) येथे भव्य एल्गार मोर्चा काढला

 रेल्वे कृती समितीच्या वतीने कोतुळ गावातून  विद्यार्थ्यांची रेल्वेची मागणी करत फेरी काढली  त्यानंतर कोतुळ ग्रामपंचायत कार्यालया समोर जाहीर रेल्वे परिषद सभा झाली अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब बाबुराव देशमुख हे होते 

अकोले तालुका रेल्वेने  जोडला जावा आणि अकोले तालुक्यातील भावी पिढीला दळणवळणाच्या अधिक सुविधा  उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियोजित… पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे देवठाण व बोटा स्टेशनसह पूर्वीच्या सर्व्हेप्रमाणेच झाला पाहिजे. 

 या सह  अकोले तालुका मुंबईला जोडण्यासाठी शिर्डी- अकोले- घोटी रेल्वेमार्ग ही  झालाच पाहिजे अशी मागणी ही. या रेल्वे परिषदेत करण्यात  आली 

अकोले तालुका निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.  रेल्वेने अकोले तालुका देशाशी जोडला जाईल तेव्हा लाखो पर्यटक अकोले तालुक्यातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येतील व त्यातून अकोले तालुक्यातील हजारो युवकांना रोजगाराच्या नवीन संधी आपापल्या गावात,

परिसरातच उपलब्ध होतील. कमीतकमी वेळात नाशिक व पुणे या महानगरात जाण्या-येण्यासाठी. गावातच राहून दररोज नाशिक / सिन्नर / चाकण येथील एम.आय.डी.सीतील कंपन्यांमध्ये कामाला जाण्यासाठी. पुण्यातील शिक्षण संस्थांमध्ये जाऊन शिक्षण घेण्यासाठी. आपल्या शेतातील शेतमाल, भाजीपाला, दूधाची नाशिक पुणे येथील बाजारपेठेत विक्री करुन दोन पैसे अधिक मिळविण्यासाठी. . रेल्वे अकोल्यातून गेली  पाहिजेअशी मागणी यावेळी करण्यात आली

 शेतकरी नेते डॉ. अजित नवले, विनय सावंत,डॉ संदीप कडलग  कॉ.तुळशीराम कातोरे, कोतुळ चे माजी सरपंच राजू पाटील देशमुख, राजाराम गंभिरे, अनिल देशमुख, कुंडलिक गंभीरे, सदाशिव साबळे, मनोज देशमुख भाऊसाहेब  वाकचौरे, आदींनी यावेळी आपले परखड मत व्यक्त केले

 प्रारंभी कोतूळ परिसरातील शाळांच्या  विद्यार्थ्यांनी गावातून भव्य अशी फेरी काढून रेल्वे मागणीच्या जोरदार घोषणा दिल्या. सुमारे दोन हजार विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले देवेंद्र मामा रेल्वे द्या,एकनाथ मामा रेल्वे दया, अजित मामा रेल्वे द्या, विखे मामा रेल्वे दया,खताळ मामा  रेल्वे दया लहामटे मामा रेल्वे दया, रेल्वे आमच्या हक्काची नाही, तालुक्याच्या विकासाची अशा घोषणा देण्यात आल्या. दोन हजार पेक्षा अधिक रेल्वे मागणीचे पोस्ट कार्ड यावेळी  पोस्ट पेटीत टाकून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले

शेतकरी संघटनेचे महेश नवले, म्हाळादेवीचे सरपंच प्रदीप हासे,जिल्हा परिषदेचे  माजी सदस्य बाजीराव दराडे, संतोष तळपाडे,कोतुळ चे सरपंच  भास्कर लोहकरे, प्रकाश साबळे, वाशेरे गावचे सरपंच  रमेश शिरकांडे कळस गावचे सरपंच राजेंद्र गवांदे,धामणगाव पाट चे अजित चौधरी, सचिन गिते, बाळासाहेब भोर, उमेश देशमुख,  विनोद देशमुख,  सचिन देशमुख,राजू गंभीरे, कुंडलीक गंभीरे, गौतम रोकडे, करंडीचे सरपंच चंद्रकांत गोंदके   संजय सोनवणे,,चंद्रकांत घाटकर रघुनाध जाधव, संजय लोखण्डे, संतोष फपाळे,  निवृत्ती पोखरकर  आदी यावेळी सहभागी झाले

  सर्वे केलेल्या जुन्या मार्गानेच नाशिक पुणे रेल्वे मार्ग होणार असे जाहीर करा आम्ही आंदोलन थांबवतो अन्यथा 31 जानेवारीला समृद्धी  महामार्गावर  दहा हजाराच्या लोकांचा मोर्चा नेऊन आंदोलन करू आमच्यावर कितीही केसेस होऊ द्या मागे हटणार नाही नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही असा इशारा असा इशारा रेल्वे कृती समितीचे  सिन्नर तालुक्याचे नेते हरिभाऊ तांबे यांनी दिला

-हरिभाऊ तांबे

नेते सिन्नर तालुका रेल्वे कृती समिती  

 

 नाशिक – पुणे रेल्वे मार्गाचा मार्ग बदलणे चे कारण निरर्थक आहे पूर्वीच्या सर्व्हे प्रमाणेच अकोल्यातून देवठाण व बोटा हे थांबा झाला पाहिजे रेल्वेमुळे अकोल्यातील सर्वसाधारण शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे पर्यटन व रोजगार वाढेल अकोले तालुक्यात होत असलेल्या रेल्वे हक्क परिषादा या मोठ्या आंदोलनाची पायाभरणी आहे

 डॉ. अजित नवले 

शेतकरी नेते, माकप

मूळ  सर्व्हे योग्य होता त्यात राजकीय  हस्तक्षेप नव्हता  त्यामुळे तो सर्वे राजकारण विरहित होता त्याच मार्गाने रेल्वे मार्ग झाला पाहिजे   धरणा इतकीच रेल्वे  महत्वाची आहे   धरण,रस्ता, रेल्वे,  या  विकासाच्या  रक्तवाहिन्या  आहेत    घोटी – शिर्डी रेल्वे ची ही तितकीच आवश्यकता आहे  पक्षा पक्षा मधील राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने यात सहभागी व्हावे

विनय सावंत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button