इतर

श्री जगन्नाथ पुरी ओडीसा येथे भारतीय मजदूर संघाचे २१ वे अखिल भारतीय अधिवेशन –


पुरी (ओडिशा) |

भारताच्या सर्वात मोठ्या राष्ट्रवादी श्रमिक संघटनेपैकी एक असलेल्या भारतीय मजदूर संघ (BMS) चे २१वे अखिल भारतीय अधिवेशन ओडिशातील पवित्र नगरी पुरी येथे दि. ६, ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्रमाचा गौरव हाच राष्ट्राचा गौरव” या ब्रीदवाक्यासह भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे.


अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय अध्यक्ष मा. श्री हिरण्मय पंड्या भूषविणार असून, उद्घाटन केंद्रीय श्रम व क्रीडा मंत्री मा. डॉ. मनसुख मंडाविया यांच्या हस्ते होणार आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO), नवी दिल्लीच्या संचालिका सुश्री मिचिको मियामोटो प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बदलत्या जागतिक परिस्थितीत श्रमिक चळवळीची भूमिका स्पष्ट करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिम्पोजियमचे उद्घाटन ओडिशाचे माननीय मुख्यमंत्री श्री मोहन चरण माझी करतील. या परिषदेत १५ देशांतील प्रतिनिधींचा सहभागी असल्याने अधिवेशनाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व अधोरेखित होते.

या ऐतिहासिक अधिवेशनात महाराष्ट्र प्रदेशातून भारतीय मजदूर संघ संलग्नीत केंद्रीय महासंघ चे पदाधिकाऱ्यांसह, महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी , व वरिष्ठ पदाधिकारी सुमारे २००प्रतिनीधी अधिवेशनात सहभागी होत असून, ही उपस्थिती महाराष्ट्रातील श्रमिक चळवळीची संघटनात्मक ताकद दर्शवणारी आहे.
वीज, रेल्वे, बँकिंग, विमा, संरक्षण अंगणवाडी, आशा वर्कर्स, घरेलू कामगार, कंत्राटी कामगार, बीडी कामगार, खाजगी ओद्यौगीक क्षेत्र , प्लॅटफॉर्म वर्कर्स, बांधकाम कामगार आदी विविध क्षेत्रांतील राज्यस्तरीय पदाधिकारी या अधिवेशनात सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत.
हे शिष्टमंडळ भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे व प्रदेश महामंत्री किरण मिलगीर यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होत असून, महाराष्ट्रातील कामगारांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर ठामपणे मांडले जाणार आहेत.
अधिवेशनात मांडले जाणारे प्रमुख मुद्दे व ठराव
या अधिवेशनात पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक व ठोस भूमिका मांडण्यात येणार आहे—


कंत्राटी कामगारांसाठी कंत्राटदारविरहित रोजगार व्यवस्था
रोजगार स्थैर्य व जीवनमान वेतन (Living Wage) ची अंमलबजावणी समान कामास समान वेतन
सामाजिक सुरक्षा, भविष्य निर्वाह निधी व ईएसआयचे काटेकोर पालन प्लॅटफॉर्म व गिग वर्कर्सना कायदेशीर संरक्षण
AI व तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या बदलांमध्ये कामगार हितांचे संरक्षण


अधिवेशनाच्या ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुरी येथे भव्य श्रमिक रॅली व सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली असून, या रॅलीत महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या अधिवेशनात कामगार हितांचे संरक्षण, रोजगार सुरक्षा , जीवन वेतन, सामाजिक सुरक्षीता , आणि राष्ट्रनिर्मितीत श्रमिकांची भूमिका अधिक सशक्त करण्यासाठी ऐतिहासिक ठराव होणार असल्याची माहिती सचिन मेंगाळे भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष , व अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली आहेत .
भारताच्या विकास यात्रेत श्रमिकांना केंद्रस्थानी ठेवणारे हे २१वे अखिल भारतीय अधिवेशन महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील कामगार चळवळीला नवी दिशा देणारे ठरणार असल्याचे सचिन मेंगाळे यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button