इतर

जिलेटिन च्या स्फोटात उडालेला दगड डोक्यात पडून कोपरगाव तालुक्यातील एका कामगाराचा मृत्यू

अकोले तालुक्यातील पांगरी येथील घटना

अकोले प्रतिनिधी

ब्लास्टिंगच्या/ जिलेटिन च्या स्फोटात उडालेला दगड डोक्यात पडून कोपरगाव तालुक्यातील एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना पांगरी (तालुका अकोले ) येथे घडली

या घटनेत मृत झालेल्या कामगाराचे नाव नितीन धोंडीराव थोरात ( वय 37 वर्ष रा रांजणगाव ता कोपरगाव) असून आज शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली
पांगरी शिवारातील त्र्यंबक दगडू काळे यांनी आपले बंधूं सुकदेव डोंगरे यांचे शेतात विहीर खोदण्याचे काम राहुरी तालुक्यातील आढाव नावाच्या ठेकेदाराला दिले होते.एल आर फोकलन मशीनच्या सहाय्याने शेतकऱ्याच्या विहिरीचे काम आठ दिवसापासून सुरू होते विहीर खोदकाम करत असताना जिलेटिनचा स्फोट घडून एल आर मशीनच्या सहाय्याने विहिरीतील दगड – मातीमुरूम खोदकाम चालू होते
दुपारी दोन ते अडीच वाजणेच्या सुमारास ब्लास्टिंग चा स्फोट घडून आणला यावेळी स्फोटाच्या दणक्याने दुरवर थांबलेल्या कामगाराच्या डोक्यात दगड पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला कामगाराला कोतुळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली

दरम्यान अकोले तालुक्यात स्टोन क्रेशर च्या दगड खाणी, गौण खनिज उत्खनन,विहिरींचे खोदकामासाठी लागणाऱ्या जिलेटीन साहित्याचे मोठे साठे बेकायदेशीरपणे तालुक्यात ठीक ठिकाणी साठवलेली आहे अनेक व्यावसायिक या व्यवसायामध्ये पुढे आलेले असून कोणत्याही नियमाचे पालन न करता दिवसा व रात्री कधीही जिलेटिन स्फोटके उडून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे

कोतुळ येथील एका राजस्थानी व्यवसायिकाने काही दिवसांपूर्वी आंभोळ येथे एका ठिकाणी जिलेटिनचा स्फोट केला असता जवळच्या वाळीबा चौधरी या शेतकऱ्याच्या घरावरील पत्र्याची मोठी नुकसान झाली या नुकसानीवरून यावेळी दोन शेतकऱ्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता

अकोल्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी या जिलेटिन चे साठे आढळून येत आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे एखाद्या मोठ्या दुर्घटनेला ते आमंत्रण देऊ शकतात

जिलेटिन व्यवसायिकांकडे वेळीच लक्ष न दिल्यास अकोले तालुक्यात मोठी दुर्घटना घडू शकते अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button