इतर

राजूर (ता अकोले) येथील स्टेट बँके कडून मयत खातेदाराचे वारसाला 2 लाखाची मदत

विलास तुपे

राजूर/प्रतिनिधी 

अकोले तालुक्यातील  राजूर येथील स्टेट बँक  ऑफ इंडिया शाखा राजूर  शाखा   बँकेचे  मयत खातेदार सभासदांच्या वारसाला दोन  लाखाची मदत  दिली  

मयत फसाबाई भीमा धिंदळे (राहणार शिरपुंजे. ता अकोले) यांच्या प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेच्या पॉलिसीचा दावा निकाली काढण्यात आला आहे. त्यांचे वारस भीमा महादु धिंदळे यांना 2 लाखांची आर्थिक मदत मंजूर करून त्यांच्या एसबीआय बँकेच्या बचत खात्यात वर्ग करण्यात आली आहे.

वारस भीमा धिंदळे यांनी शाखेतील सर्व कर्मचारी व त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल  आभार मानले.

यावेळी शाखा अधिकारी दिलीप घुले, सहायक अधिकारी अजय काळे, तसेच  कर्मचारी  उपस्थित होते

ही योजना गरीब आणि मध्यमवर्गीय परिवारांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते. प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना ही भारत सरकारने सुरू केलेली एक सामाजिक सुरक्षा योजना आहे ही योजना 18 ते 50 वर्ष वयोगटातील नागरिकांना दोन लाख रुपयाचा जीवन विमा कव्हर प्रदान  करते

———=

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button