श्री क्षेत्र कोतुळेश्वर मंदिर कोतुळ येथे महाशिवरात्री निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील श्री क्षेत्र कोतुळेश्वर मंदिर, येथे महाशिवरात्री निमित्त. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
यानिमित्ताने सोमवार दि. ०९/०२/२०२६ ते सोमवार दि. १६/०२/२०२६ पर्यंत. महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला आहे
या दरम्यान दररोज पहाटे ४ ते ६ वा. : काकडा आरती सकाळी ७ ते ११ वा. : ज्ञानेश्वरी पारायण दु. ३ ते ५ वा. : नेमाचे भजन सायं. ५ ते ६ वा. प्रवचन सायं. ६ ते ७ वा. : हरिपाठ रात्री ७ ते ९ वा. : किर्तन, महाआरती व नंतर महाप्रसाद असा दैनिक कार्यक्रम पार पडणार आहेत यावेळी
विनोदाचार्य ह. भ. प. दयानंद महाराज कोरेगावकर ,किर्तनकेसरी ह. भ. प. दिनानाथ महाराज सावंत (मालेगाव), किर्तनकेसरी ह.भ.प. संजय महाराज वेळूकर (सातारा)
भागवताचार्य ह.भ.प. विश्वनाथ महाराज वारिंगे (भिवंडी) वेदांताचार्य ह.भ.प.प्रसाद महाराज भोर (गाया मंदिर, देहु) प. पु. श्री स्वामी १००८ हरि चैतन्य महाराज (खुला)
विनोदाचार्य ह. भ. प. गोविंद महाराज गोरे (आळंदी) भागवताचार्य ह. भ. प. अमोल महाराज वाकळे यांचे कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे
भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री क्षेत्र कोतुळेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट, कोतूळ, कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था व कोतुळ ग्रामस्थांनी केले आहे
श्री क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान कोतुळ येथे दरवर्षी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन केले जाते महाशिवरात्रीसाठी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात तालुक्यातील हे जुने व जागृत देवस्थान आहे. देवस्थानचे अध्यक्ष सुरेशराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात अनेक विकास कामे सुरू आहेत कोतुळेश्वर देवस्थानला शासनाने ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. आमदार डॉ किरण लहामटे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी प्राप्त झाला आहे या निधीतून भव्य अशा शिवपार्वती मंगल कार्यालयाची उभारणी तसेच अनेक विकास कामे प्रगती पथावर आहेत



