अहमदनगर
जाचकवाडी येथील विकास कामांसाठी ग्रामस्थांनी घेतली खासदार वाकचौरे यांची भेट

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील जाचकवाडी येथील विविध विकास कामांच्या संदर्भात ग्रामस्थांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भेट घेतली व विविध विकास कामांची मागणी केली
प्रामुख्याने स्मशानभूमी दुरुस्ती तसेच महादेव मंदिर रस्ता कॉंक्रिटीकरण ही कामे प्राधान्याने करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे खासदार वाकचौरे यांच्याकडे केली यावेळी शिवनाथ घुले योगेश महाले नितेश जाचक आदी उपस्थिती होते यावेळी खासदार वाकचौरे यांनी गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले
=======



