इतर

सुचेता गावडे यांना “सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग लीडर ऑफ द इयर” पुरस्कार जाहीर

सगमनेर प्रतिनिधी

..वूमन्स इन टेक ग्लोबल अॅवॉर्ड २०२५ चा सुचेता गावडे यांना “सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग लीडर ऑफ द इयर” पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सुचेता गावडे या आरोग्य-तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. त्यांनी सुरक्षित आणि आधुनिक इंजिनिअरिंग प्लॅटफॉर्म उभारण्यात तसेच त्यांच्या क्षेत्रातील इतर तंत्रज्ञांना मार्गदर्शन करण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांना ‘वूमन्स इन टेक ग्लोबल अॅवॉर्ड २०२५’ मध्ये ‘ग्लोड विनर’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांना “सॉफ्टवेअर इंजिनिअरींग लिडर ऑफ द इयर” हा पुरस्कार इनक्लूसिव्ह लिडरशिप अँड मेंटॉरशीप या श्रेणीत प्रदान करण्यात आला आहे. महाराष्टाच्या रहिवासी असलेल्या गावडे सध्या अमेरिकेतील एका आघाडीच्या आरोग्यसंस्थेत कार्यरत आहेत.

वूमन टेक नेटवर्क यांच्या आयोजनाखाली होणारे वूमन्स इन टेक ग्लोबल अॅवॉर्डर्स हे महिला, अल्पसंख्याक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकाऱ्यांचा सन्मान करणारे जगातील सर्वात मोठे पुरस्कार सोहळे मानले जातात . या स्पर्धेत १२८ देशांतील २७विविध श्रेणींमध्ये एकूण १,७६० स्पर्धक सहभागी झाले होते. नेतृत्व, नवकल्पना आणि विविधतेसाठी उपक्रम राबवणाऱ्या महिलांचा गौरव या पुरस्कारांद्वारे केला जातो. सुचेता गावडे यांच्यासारख्या व्यक्तींमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात बदल घडतो आणि विशेषतः महिलांसाठी नव्या संधी निर्माण होता आहेत .

वूमन टेक नेटवर्क ही १७९ देशांमध्ये १३,००० पेक्षा अधिक अँबॅसिडर्स असलेली जागतिक समुदाय संस्था आहे. नुकतेच या पुरस्कार समारंभात विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. या सोहळ्यात थेट कार्यक्रम, प्रमुख भाषणे, चर्चा सत्रे, फायरसाईड चॅट्स आणि नेटवर्किंगसाठी संवादात्मक मंच उपलब्ध असणार आहे .

गावडे यांना मिळालेली ही मान्यता त्यांच्या तांत्रिक कार्यासोबतच समावेश, सहानुभूती आणि परिणामाधिष्ठीत नेतृत्वशैलीचे प्रतिबिंब आहे. इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये त्यांनी क्लाऊड-आधारित एंडपॉईंट सोल्युशन्स तसेच सुरक्षित आधुनिक प्लॅटफॉर्म विकसित करण्यावर भर दिला आहे. यामुळे संस्थांना मजबूत एंडपॉईंट व्यवस्थापन, अधिक सुरक्षितता आणि उत्तम वापरकर्ता अनुभव मिळतो. विशेषतः आरोग्य क्षेत्रात जिथे विश्वसनीयता, गोपनीयता आणि रुग्णसेवा अखंड सुरू राहणे अत्यंत आवश्यक असते.

“समावेशक नेतृत्व आणि मार्गदर्शनासाठी ‘सॉफ्टवेअर इंजिनिअरींग लिडर ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी अत्यंत अर्थपूर्ण आहे. तो माझ्या तांत्रिक यशासोबतच मी जपलेल्या मूल्यामुळे मिळाला आहे.त्याच बरोबर समाजउन्नतीचा सन्मान करतो,” असे गावडे म्हणाल्या. “तंत्रज्ञानातील माझा प्रवास सतत शिकणे, वाढ आणि नेतृत्व यावर आधारित राहिला आहे. माझा ठाम विश्वास आहे की समावेशकतेने आणि उद्देशपूर्ण नेतृत्वाने इतरांना पुढे जाण्यास मदत करता येईल’
सहकाऱ्यांनी त्यांच्या तांत्रिक कौशल्यासोबतच उत्कृष्ट अंमलबजावणी क्षमतेचे कौतुक केले आहे जटील प्रणाली पटकन समजून घेणे, नवीन क्षमतांचा विकास करून मोजता येईल असा परिणाम साधणे, तसेच स्पष्ट संवाद आणि विविध विभागांमधील सहकार्याद्वारे टीमची कामगिरी उंचावणे अपेक्षित आहे.तंत्रज्ञानामुळे संस्था आणि व्यक्तींच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवण्याची क्षमता. “तंत्रज्ञान जसजसे विकसित होत जाते, तसतसे प्रत्येक नवीन क्षमता ही वास्तविक समस्या सोडवण्याची आणि शक्यतेची मर्यादा वाढवण्याची संधी आहे. तंत्रज्ञान समुदायामधील शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि सहज उपलब्ध तांत्रिक शिक्षणाद्वारे इतर व्यावसायिकांना सक्षम करण्याचा प्रयत्नाची आवश्यकता आहे. गावडे या लेखनातून, सार्वजनिक भाषणातून आणि मार्गदर्शन करत असतात..इतरांना यशस्वी होण्यास मदत करतात.

“जेव्हा तुम्ही मजबूत इंजिनिअरिंग अंमलबजावणीला उद्देशपूर्ण नेतृत्व आणि जबाबदारीशी जोडता, तेव्हा प्रभाव अधिक वेगाने वाढतो. त्यानुसार तुमची प्रगतीही होते,” असे त्यांनी सांगितले. श्रीमती गावडे या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ.शकुंतला काळे यांच्या स्नुशा आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button