इतर

वृद्धाश्रम व अंध विद्यार्थी वसतिगृहासाठी पाण्याच्या टाकीचे उद्घाटन

 नाशिक प्रितिनिधी

     नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, जिल्हा शाखा ,नाशिक ( नॅब)   ला जे. के  मैनानी प्रिसिजन टेक्नॉलॉजी लि.सिन्नर यांच्या सीएसआर निधीतून  नाशिक रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट व  रोटरी क्लब ऑफ नाशिक   द्वारे नॅब  संचलित बेळगाव ढगा येथील अंध ज्येष्ठ ,ज्येष्ठ नागरिक आणि अंध विद्यार्थी वसतीगृहासाठी   पन्नास हजार लिटरच्या पाण्याची टाकी  बांधण्यासाठी दहा लाख पाच हजार रुपयांची देणगी देण्यात आली होती. त्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल रोटे राजेंद्र भामरे  यांच्या हस्ते संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी व्यासपीठावर  राजेंद्र भामरे,रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर ,कंपनीचे सीओओ कमलाकर टाक, *नॅब* च्या  अध्यक्षा व  रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या जनसंपर्क संचालिका अॅड. विद्युल्लता तातेड,  सेक्रेटरी शितल सुराणा ,मकरंद चिंधडे , सुहास कुलकर्णी व बेळगाव ढगाच्या ग्रामसेविका आशा गोराणे होते.

  ‘नॅब’च्या अध्यक्षा अॅड विद्युल्लता तातेड  यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले.  नॅब चे संस्थापक अध्यक्ष अॅड प्रकाशचंद्रजी सुराणा यांच्या प्रेरणेतून व समाजातील दानदात्यांच्या आर्थिक मदतीच्या सहाय्याने अंध ज्येष्ठ, ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम आणि अंध विद्यार्थी वसतिगृहाचा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेंद्र भामरे यांनी रोटरी  सामाजिक बांधिलकीच्या तत्वावर राबवित असलेल्या विविध प्रकल्पांचा उल्लेख करून नॅब च्या कार्याचे कौतुक केले.  कमलाकर टाक, रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ.गौरव सामनेरकर, मिलिंद चिंधडे व आशा गोराणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  नॅब चे कार्याध्यक्ष  अनिल चव्हाण यांनी केले. शितल सुराणा यांनी सर्वांचे आभार मानले.

    या कार्यक्रमाला ओम प्रकाश रावत, अनिल सुकेनकर, हेमंत देशपांडे, अॅड कांतिलाल तातेड, विजय टाटिया, रोहित देशपांडे,विनायक देवधर , डॉ. सायखेडकर अनिल खालकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button