इतर

पठार भागातील काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपला – बाळासाहेब थोरात

:

संजय उकिरडे / महादर्पण प्रतिनिधी


बोटा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते कै. लक्ष्मण नन्हुजी पावडे (गुरूजी) यांच्या निधनानंतर लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी त्यांच्या समवेत संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री.अजय भाऊ फटांगरे, शॅम्प्रो चे व्हा चेअरमन रामहरी कातोरे, राजहंस दूध संघाचे संचालक बबन शेठ कुऱ्हाडे,मा. पंचायत समिती सदस्य बापूशेठ जाधव,युवा काँग्रेस पठार भाग अध्यक्ष बाळासाहेब कुऱ्हाडे, बोटा तंटामुक्ती अध्यक्ष रामभाऊ बापू शेळके, सुहास वाळुंज, विकास शेठ शेळके, जगदीश आहेर, प्रमोद कुरकुटे, शिवाजी पाटील शेळके, सुखदेव शेठ शेळके, शिवाजी मुसळे,शिवदास सोनटक्के, अरुण काळे, रमेश वाकचौरे, आल्लीभाई तांबोळी, अरुण वाकचौरे, शिवाजी बोडके, एकनाथराव शेळके सुरेश जाधव, इस्माईल शेख, बाळासाहेब निवृत्ती कुऱ्हाडे, सिताराम हरी जाधव, बाबू नाना शेळके, राजवर्धन पिसाळ, राजू भालेराव, कवी शेळके, महिला बचत गटाच्या संघटक भाग्यश्रीताई नरवडे , छाया भालेराव, राजश्री जाधव, तृप्ती भालेराव अनेक विविध संस्थेचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते गुरुजींच्या प्रतिमेला पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली,

पावडे गुरुजींच्या जाण्याने काँग्रेस पक्षात पठार भागात मोठी पोकळी निर्माण झाली असून काँग्रेस पक्षाने निस्वार्थी काम करणारा कार्यकर्ता गमावला आहे अशी भावना यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button