श्रीसंत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सव समितीअध्यक्षपदी प्रा. सौ.पल्लवी सैंदोरे,

उपाध्यक्षपदी नीतीन जोर्वेकर, कार्याध्यक्ष सौ.श्रद्धा तुळे, तर सचिव पदी संजय उपाध्ये यांची निवड

संजय उकिरडे /महादर्पण प्रतिनिधी
श्रीरामपूर येथील शिरसगाव परिसरातील इंदिरानगरमधील श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानतर्फे आयोजित श्रीसंत गोरा कुंभार पुण्यातिथी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्रीराम अबॅकस क्लासच्या संचालिका प्रा. सौ.पल्लवी नंदकुमार सैंदोरे, उपाध्यक्षपदी नीतीन प्रभाकर जोर्वेकर, कार्याध्यक्षपदी सौ. श्रद्धा चेतन तुळे तर सचिवपदी संजय कारभारी उपाध्ये यांची निवड झाली आहे.
श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानची स्थापना ०९मे १९९० मध्ये श्रीसंत कडुबा उफाड आणि श्रीमती सुमनबाई श्रीधर मांढरे यांच्या शुभहस्ते झाली. गेल्या ३६ वर्षापासून प्रतिष्ठान साहित्यिक, समाजसेवाभावी उपक्रम घेत आहे. श्रीसंत गोरा कुंभार यांच्या ७०९ व्या पुण्यतिथी निमित्त संतसाहित्य पुरस्कार आणि उत्कृष्ठ साहित्यसेवा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष प्रा. सौ.पल्लवी सैंदोरे यांनी सांगितले. ह्या वर्षी विविध प्रेरक उपक्रमातून श्रीसंत गोरा कुंभार पुण्यतिथी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष नीतीन जोर्वेकर यांनी सांगितले. कार्याध्यक्ष सौ. श्रद्धा तुळे व संजय उपाध्ये यांनी प्रतिष्ठान पदाधिकारी संस्थापक डॉ. बाबुराव उपाध्ये, कोषाध्यक्षा सौ. मंदाकिनी उपाध्ये, पीएसआय मेजर नंदकुमार सैंदोरे, रवींद्र सैंदोरे, कचरू जोर्वेकर,प्रा. विलासराव तुळे, सौ. कुंदा तुळे, सौं. माधुरी जोर्वेकर, चेतन तुळे, कृष्णा सैंदोरे आदिंनी २०२६च्या उत्सव समिती सदस्यांचे अभिनंदन केले . कार्याध्यक्ष सौ. श्रद्धा तुळे यांनी आभार मानले



