अंबितखिंड (ता अकोले )येथील शाळेला वॅन्हुआ कंपनीकडून शालेय साहित्याची भेट!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील सर्वोदय विद्यामंदिर, अबितखिंड या विद्यालया स वॅन्हुआ इंटरनॅशनल(इंडिया )प्रा. लि. या कंपनीच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून सुमारे ३ लाख रुपये किमतीच्या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे.
या कार्यक्रमात शाळेला अत्याधुनिक स्मार्ट इंटरअॅक्टिव्ह बोर्ड, आर.ओ. वॉटर फिल्टर, लॅपटॉप आणि क्रीडा साहित्य अशा विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय घनकुटे होते. वॅन्हुआ कंपनीचे समन्वयक श्री. सचिन शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डिजिटल शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर प्रकाश टाकला. तसेच, भविष्यात ही शाळा संपूर्णपणे ‘डिजिटल’ करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. सुर्वे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. साळवे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक आर के गीते यांनी केले

.या प्रसंगी अंबितखिंड गावच्या सरपंच यमुनाताई घनकुटे, बाळासाहेब गोडे कडू सर, साळवे सर, कचरे सर, गोडे सर, दत्तात्रय फुलसुंदर, दत्ता मुठे, नवले मॅडम, सोनावणे मॅडम,यांसह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वॅन्हुआ कंपनीच्या या दातृत्वामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, शाळेच्या वतीने कंपनीचे आभार मानण्यात आले आहेत.



