इतर

जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक डॉ.संजय दुशिंग यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न


श्रीरामपूर दि 15 शासनाच्या आरोग्य विभागामध्ये ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सतत कार्यरत राहून कुष्ठरोग सेवा देणारे, प्रामाणिक कुष्ठरोगतज्ज्ञ जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले डॉ. संजय चोखाजी दुशिंग यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
श्रीरामपूर येथील स्वयंवर मंगल कार्यालयात संजय चोखाजी दुशिंग सत्कार समितीच्या वतीने डॉ. संजय दुशिंग, सौ. विणाताई दुशिंग यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी आत्या श्रीमती हौसाबाई खाजेकर यांचाही सन्मान करण्यात आला.

आरोग्य सेवा कुष्ठरोग, सहाय्यक संचालक, अहिल्यानगरचे डॉ. राजेंद्र खंडागळे, माजी प्राचार्य टी.ई. शेळके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. लक्ष्मण कोल्हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा चिकित्सक स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वसंतराव केरुजी जमधडे होते. विचार जागर मंचचे सदस्य डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.प्रारंभी छत्रपती शिवराय, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

सत्कार समितीच्या वतीने सन्मानपत्र, भारतीय संविधान ग्रंथप्रत, शाल, पुष्पहार, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष करणदादा ससाणे, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन गुजर, अण्णासाहेब डावखर, आरपीआयच जिल्हा अध्यक्ष सुभाषराव त्रिभुवन, माजी नगरसेवक ढोकणे, कॉ. श्रीधर आदिक, बाळासाहेब सुरुडे, डॉ. संदीप साळुंखे, डॉ. सौ. शिवोनी साळुंखे, चैतन्य दुशिंग,सौ. दिव्या दुशिंग,बाळासाहेब बनकर, विलासराव खाजेकर, माजी प्राचार्य पोपटराव निकम, लेविन भोसले, प्रा. विलासराव तुळे, रमेशराव आंभोरे आदी अनेक मान्यवरांनी डॉ. संजय दुशिंग यांचा सत्कार केला.डॉ. राजेंद्र खंडागळे यांनी डॉ. संजय दुशिंग यांच्या कुष्ठरोगी कार्यातील शासकीय सेवा मनोभावे केली, हे आदर्शवत असल्याचे सांगितले, डॉ. संजय दुशिंग सत्काराला उत्तर देताना म्हणाले, माझ्या जीवनात आदर्श कुटुंब, आदर्श गुरुवर्य,शासकीय सेवेतील सेवाभावी सहकारी, विचारजागर मंच सह अनेक सेवाभावी व्यक्ती, संस्थेचे सेवाकार्य मी सदैव समोर ठेवले. डॉ. वसंतराव जमधडे यांच्या सेवेचा आदर्श संस्कार सांगत आपला जीवनप्रवास व कुष्ठरोग कार्यातील अनुभव विशद केले. अनेकांनी केलेला सन्मान मला सदैव प्रेरणा देईल अशा भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. लक्ष्मण कोल्हे यांनी डॉ. संजय दुशिंग यांचे कुष्ठरोग कार्यातील योगदान मौलिक स्वरूपाचे असून त्यांनी डॉ. बाबा आमटे यांचा आदर्श जपला आहे. हा सत्कार सोहळा म्हणजे सत्कार्याचा सत्कार आहे.माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी डॉ. संजय दुशिंग म्हणजे सेवेचे आदर्श आहेत, सुखदेव सुकळे यांनी डॉ.संजय दुशिंग यांचे जीवन समृद्ध आहे, कारण त्यांचे कार्य प्रामाणिक आहे, असे सांगून शुभेच्छा दिल्या. म मुख्याध्यापक सुनील साळवे, अशोकराव दिवे, उत्तमराव डांगे, बाबासाहेब खरात,विजयराव खाजेकर, मेजर कृष्णा सरदार,ॲङ् सुधाकर मोहन,संजय बनकर, रितेश एडके आदिंनी मनोगत व्यक्त केले. डॉ. वसंतराव जमधडे यांनी अध्यक्षीय मनोगतातून डॉ. संजय दुशिंग म्हणजे एक प्रांजळ असे सहकारी होते, त्यांची सेवावृत्ती आजही समाजाला दिशादर्शक असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ, प्रविण जमधडे यांनी केले तर गोरख आढाव यां नी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button