इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.३०/०३/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ०९ शके १९४८
दिनांक :- ३०/०३/२०२६,
वार :- इंदूवासरे(सोमवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२६,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:४१,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर वंसतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- द्वादशी समाप्ति ०७:१०,
नक्षत्र :- मघा समाप्ति १४:४८,
योग :- शूल समाप्ति १६:५९,
करण :- कौलव समाप्ति १९:००,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- मीन – उ.भा.,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मेष,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०७:५८ ते ०९:३० पर्यंत,

लाभदायक वेळा:-
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:२६ ते ०७:५८ पर्यंत,
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:३० ते ११:०२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:३७ ते ०५:०९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:०९ ते ०६:४१ पर्यंत,

❀ दिन विशेष:
सोमप्रदोष, अनंगव्रत, विष्णूला दवणा वाहणे, घबाड १४:४८ प., त्रयोदशी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ०९ शके १९४८
दिनांक = ३०/०३/२०२६
वार = इंदुवासरे(सोमवार)

मेष
एकमेकांना उत्तम प्रकारे समजून घ्याल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. आवडत्या वस्तु खरेदी कराल. झोपेची तक्रार कमी होईल. हातात नवीन अधिकार येतील.

वृषभ
कर्तृत्वाची योग्य जाणीव ठेवाल. आध्यात्मिक गोष्टींत प्रगती करता येईल. उपासनेला अधिक बळ मिळेल. तात्विक गोष्टींवर मतभेद संभवतात. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.

मिथन
नाटक सिनेमा पहायला जाल. छंद जोपासला वेळ मिळेल. लहान सहान दुखण्याकडे दुर्लक्ष नको. काही कामे अधिक वेळ घेतील.

कर्क
मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. स्त्रियांशी मैत्री वाढेल. घरगुती वातावरण खेळीमेळीचे राहील. तुमच्यावर जोडीदाराचा प्रभाव राहील. वरिष्ठांना नाराज करू नका.

सिंह
पित्त विकार बळावू शकतात. सहकुटुंब जवळचा प्रवास कराल. निसर्गाच्या सान्निध्यात रमून जाल. सौंदर्यप्रसाधनेच्या वस्तु खरेदी कराल. तुमच्यातील चांगल्या गुणांची दाखल घेतली जाईल.

कन्या
कौटुंबिक सौख्य वाढेल. जोडीदाराच्या प्राप्तीत वाढ होईल. संपर्कातील लोकांची गाठ घेता येईल. मनाची विशालता दाखवाल. उच्च रहाणीमानाची आवड जोपासाल.

तूळ
दिवस मनाजोगा व्यतीत कराल. व्यवसायातून चांगला धनलाभ होईल. कामे वेळेवर पूर्ण होतील. घरातील गोष्टींमध्ये लक्ष घालावे. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

वृश्चिक
मानसिक चांचल्य जाणवेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल. मुलांशी मतभेद संभवतात. भावंडांचे प्रश्न सामोरी येतील.

धनू
व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. काहीसा आळशीपणा जाणवेल. जवळचे नातेवाईक भेटतील. योग्य संधीची वाट पहावी लागेल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे.

मकर
उगाच चिडचिड करू नये. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. तुमचा तर्क अचूक ठरेल. अती चौकसपणा दाखवू नका.

कुंभ
कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. घरगुती वापरासाठी वस्तूची खरेदी कराल. ध्यान धारणे साठी वेळ द्यावा. आर्थिक व्यवहार जपून करावेत. कोर्ट-कचेरीची कामे निघतील.

मीन
व्यवसाय वृद्धीकडे मार्गक्रमण करावे. मुलांच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष द्यावे. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. आपल्याच मतावर आग्रही राहाल. धूर्तपणे वागणे ठेवाल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button