रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे कायदेविषयक शिबिर लसंपन्न
रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे कायदेविषयक शिबिर संपन्न*
समाज जागृती व कायदेशीर मार्गदर्शनासाठीचा विशेष उपक्रम म्हणून रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. त्यात एडवोकेट अद्वैत गोसावी (सहाय्यक लोक अभिरक्षक कार्यालय) यांचे आर्बिट्रेशन व लोक अदालत याविषयी तर एडवोकेट ज्योती पठाडे (कायदा व परिविक्षा अधिकारी जिल्हा बाल संरक्षण कक्ष नाशिक यांचे *बालविवाह प्रतिबंधक कायदा* या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. न्या. वानवाडी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर होते.
एडवोकेट अद्वैत गोसावी यांनी आर्बिट्रेशन व लोक अदालत यांची प्रक्रिया, महत्त्व व फायदे समजावून सांगितले. लोक अदालत मुळे कमी खर्चात व कमी वेळेत दोन्ही पक्षांना योग्य तो न्याय मिळू शकतो, असे त्यांनी प्रतिपादन केले .
एडवोकेट ज्योती पठाडे यांनी *बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच *गर्भलिंग निदान* यासंबंधी सविस्तर माहिती दिली. . नेहा मेहेर यांनी जागतिक आरोग्य दिना बद्दल माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गौरव सामनेरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट राजश्री बालाजी वाले यांनी केले.आभार सेक्रेटरी सीए रेखा पटवर्धन यांनी मानले. कार्यक्रमाला दिलीप बेनिवाल, शिल्पा पारख, दमयंती बरडिया, एडवोकेट विद्युल्लता तातेड,रोहित देशपांडे, सुहास कुलकर्णी आदी उपस्थित होते.



