इतर

शरद पवारांच्या योगदानामुळे रयत शिक्षण संस्थेची उंची वाढली – भगीरथ शिंदे


कोतुळ प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचे रयत शिक्षण संस्थेसाठी प्रत्यक्ष,अप्रत्यक्षरीत्या फार मोठे योगदान आहे त्यांच्या योगदानामुळे रयत शिक्षण संस्थेची उंची वाढली असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे यांनी केले

रयत शिक्षण संस्थेच्या कोतुळेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय,कोतूळ (ता. अकोले) येथे सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या नूतन इमारतीचा भव्य भूमिपूजन सोहळा रविवार पार पडला यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते

राज्यभरातील संस्थेच्या 750 पेक्षा अधिक शाखामधून विविध उपक्रमातून विद्यार्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जाते, स्थानिक विद्यार्थी संख्या वाढवणे व संस्थेच्या शाळा विकासासाठी स्थानिक शाळा समिती व गावकऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले

रयत शिक्षण संस्थेचे सचिव तथा सेवानिवृत्त जिल्हाधिकारी विकासराव देशमुख यावेळी म्हणाले की मी तालुक्याचा भूमिपुत्र असल्याने गावकरी आणि पाहुण्यांमध्ये आल्याचा वेगळा आनंद झाला आहे या कार्यक्रमात त्यांनी गावाकडच्या काही आठवणींना उजाळा देत तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शाखांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले

तर स्व मधुकरराव पिचड यांनी आपल्या राजकीय वाटचालीत नेहमीच सकारात्मक भूमिका घेतल्याचे श्रीमती हेमलताताई पिचड यांनी यावेळी सांगितले स्व पिचड यांच्या कोतुळ सह तालुक्यात उभे केलेल्या शैक्षणिक कामाची आठवणही त्यांनी करून दिली

लिज्जत पापडचे कार्यकारी अधिकारी सुरेशराव कोते ,पुणे बाजार समितीचे सेवानिवृत्त प्रशासक बी. जे. देशमुख, कोतुळ चे माजी सरपंच राजू पाटील देशमुख, माजी विद्यार्थी शभियान शेख यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले

रयत शिक्षण संस्थेचे पदाधीकारी श्री.मनोज कवडे, नवनाथ बोडखे, बाबासाहेब नाईकवाडी, मोहन कोंगेरे ,स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष सयाजीराव देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम देशमुख, जि. प. सदस्य रमेश देशमुख,उपसरपंच संजय देशमुख, प्रमोद तोरणे, प्रकाश निकम, राम नलगे,कृषिभूषण सयाजीराव पोखरकर,अगस्तीचे संचालक मनोज देशमुख,बापूसाहेब वाकचौरे,राजेंद्र देशमुख,सयाजी देशमुख प्रा बाबासाहेब देशमुख, नितीन महाराज गोडसे.माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अनिल देशमुख ,शरीफ पठाण ,सतिश देशमुख, विनोद देशमुख, गणेश घोलप,संजय आरोटे, संजय काळे .डॉ दीपक सहाणे आदी मान्यवर उपस्थित होते
.प्राचार्य बी. के. देशमुख यांनी प्रस्ताविक केले, बी एस खतेले, एच के दुबे,व्ही एस चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर जिजाबा गोडे यांनी शेवटी आभार मानले

शाळेचे सेवानिवृत्त कलाशिक्षक संजय भागुजी उकिरडे संस्थेतून सेवानिवृत्त झाले या निमित्ताने त्यांनी कोतुलेश्वर विद्यालयास 51 हजार रुपयाची देणगी दिली तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अर्धकृती पुतळा देखील शाळेला भेट देण्यात आला यावेळी त्यांचे उपस्थितांनी कौतुक केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button