आजचे पंचांग वराशी भविष्य दि.१४/०५/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २४ शके १९४८
दिनांक :- १४/०५/२०२६,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५७,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:५४,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर ग्रीष्मऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- द्वादशी समाप्ति ११:२१,
नक्षत्र :- रेवती समाप्ति २२:३४,
योग :- प्रीति समाप्ति १७:५३,
करण :- गरज समाप्ति २२:०१,
चंद्र राशि :- मीन,
रविराशि – नक्षत्र :- मेष – कृत्तिका,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- वृषभ,(१०:५४नं. मिथुन),
राशिप्रवेश :- शुक्र – मिथुन १०:५४,
बुध – वृषभ २४:३२,
शुभाशुभ दिवस:- स. ११प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०२:०३ ते ०३:४० पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०५:५७ ते ०७:३४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:२६ ते ०२:०३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०३ ते ०३:४० पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:१७ ते ०६:५४ पर्यंत,
❀ दिन विशेष:
प्रदोष, त्रयोदशी श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २४ शके १९४८
दिनांक = १४/०५/२०२६
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल. अनाठायी खर्च केला जाईल. कलात्मक दृष्टिकोन ठेवावा. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल.
वृषभ
चारचौघांत मिळून मिसळून वागाल. मनाप्रमाणे हौस पूर्ण करून घ्याल. काम व वेळ यांचे गणित जमवावे लागेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. अनावश्यक खर्च टाळावा.
मिथुन
गरज नसलेल्या वस्तु खरेदी केल्या जातील. मानसिक गोंधळ टाळावा. प्रलोभनाला भुलून जाऊ नका. स्त्री सौख्याचा लाभ होईल. प्रवासाचा योग येईल.
कर्क
चैनीच्या वस्तु खरेदी कराल. व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने खुश राहील. जवळचे मित्र भेटतील. मनमोकळ्या गप्पा मारल्या जातील. मनातील अपेक्षा पूर्ण होतील.
सिंह
कामातून आनंद मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कामातील सुसंगतता व स्थैर्य जपाल. वडीलधार्यांचा आशीर्वाद लाभेल. कामाच्या ठिकाणी तुमचा मान वाढेल.
कन्या
धार्मिक ग्रंथ वाचाल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. फक्त कामावरच लक्ष केन्द्रित करावे. वरिष्ठांच्या नाराजीचे कारण बनू नका. दिरंगाईतून मार्ग काढावा लागेल.
तूळ
हातातील वेळेचा सदुपयोग करा. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहार जपून करावेत. उगाचच चीड-चीड करू नका. नसते साहस अंगाशी येऊ शकते.
वृश्चिक
कौटुंबिक कलह शांततेने सोडवावा. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. संपर्कातील लोकांकडून मदत मिळेल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल.
धनू
अडचणीतून वेळीच मार्ग निघेल. सहकार्यांची योग्य वेळी मदत मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. मनातील काळजी दूर होईल.
मकर
मुलांचे वागणे बिनधास्त वाटू शकते. आपले कलागुण जतन करण्याचा प्रयत्न करावा. बोलतांना इतरांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. संयम सोडू नका.
कुंभ
बर्याच गोष्टी सामोपचाराने हाताळाव्यात. वडीलधार्याच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. कौटुंबिक जिव्हाळा जतन करावा. थोरांचे विचार जाणून घ्यावेत.
मीन
जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. मित्रमंडळींचा गोतावळा जमवाल. वादाचे मुद्दे लांब ठेवावेत. सामुदायिक जाणीव जागृत ठेवावी. हाती घेतलेले काम तडीस न्याल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


