इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१८/०५/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २८ शके १९४८
दिनांक :- १८/०५/२०२६,
वार :- इंदूवासरे(सोमवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५६,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:५६,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर ग्रीष्मऋतु
मास :- अधिक ज्येष्ठ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- द्वितीया समाप्ति १७:५४,
नक्षत्र :- रोहिणी समाप्ति ११:३२,
योग :- सुकर्मा समाप्ति २१:४८,
करण :- बालव समाप्ति ०७:४६, तैतिल २८:०४,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- वृषभ – कृत्तिका,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- शुभ दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०७:३३ ते ०९:११ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
अमृत मुहूर्त — सकाळी ०५:५६ ते ०७:३३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:११ ते १०:४८ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:४१ ते ०५:१८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:१८ ते ०६:५६ पर्यंत,

❀ दिन विशेष:
धनिष्ठा नवक समाप्ति ११:३२, अमृत ११:३२ नं.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २८ शके १९४८
दिनांक = १८/०५/२०२६
वार = इंदूवासरे(सोमवार)

मेष
तुमचा आवेग योग्य ठिकाणीच दाखवा. काही ठिकाणी नरमाईचे धोरण ठेवणे योग्य ठरेल. मैत्रीतील कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. अनोळखी लोकांवर चटकन विश्वास ठेवू नका. कौटुंबिक कामे आनंदाने कराल.

वृषभ
घरगुती कामे वाढतील. स्थावरचे प्रश्न मार्गी लावावे लागतील. खळाळता उत्साह मावळू देऊ नका. अती कामामुळे थकवा जाणवेल. कामानिमित्त जवळचा प्रवास करावा लागेल.

मिथुन
वैचारिक गोंधळ टाळण्याचा प्रयत्न करावा. मनात अनेक शंका उत्पन्न होऊ शकतात. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कौटुंबिक जिव्हाळा वाढीस लागेल. बोलतांना विचारपूर्वक बोलावे.

कर्क
स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जाईल. मनातील अपेक्षांना मूर्त स्वरूप द्याल.

सिंह
नवीन लोकांशी मैत्री वाढेल. तरुण वर्गाच्या जास्त संपर्कात याल. आधुनिक विचारांची देवाणघेवाण होईल. मानसिक चांचल्य जाणवेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका.

कन्या
पोटाची काहीशी तक्रार राहील. आहाराची योग्य ती पथ्ये पाळावी लागतील. नियोजनबद्ध कामे सुरळीत पार पडतील. प्रवास सावधानतेने करावा. मन लावून काम करणे गरजेचे राहील.

तूळ
जोडीदाराची मते जाणून घ्या. वडिलोपार्जित कामे लाभदायक ठरतील. बाहेर गावी जाण्याचे बेत आखाल. कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावीत. मनातील क्षुल्लक गैरसमज दूर करावेत.

वृश्चिक
जोडीदाराची प्राप्ती वाढेल. स्थावरची कामे अचानक सामोरी येऊ शकतात. पूर्व नियोजित कामात यश येईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. नको तिथे आपले मत मांडू नका.

धनू
तुमच्या कर्तृत्वात वाढ होईल. कोणतेही काम करतांना सर्व खात्री करून घ्यावी. खेळाडूंनी अधिक कसरत करावी. महत्वाकांक्षेच्या जोरावर धाडस करतांना सावधानता बाळगा. अचानक धनलाभ संभवतो.

मकर
मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही प्रलोभनाला भुलून जाऊ नका. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनावश्यक खर्च केला जाईल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल.

कुंभ
घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. प्रवासात सामानाची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. कसलीही घाई त्रासदायक ठरू शकते. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.

मीन
वादाचे प्रसंग टाळलेलेच बरे. कलात्मक दृष्टीकोन ठेवून वागाल. गप्पा मारण्याची हौस पूर्ण कराल. इतरांचा तुमच्या विषयी गैरसमज होऊ शकतो. व्यावसायिक लाभावर लक्ष केन्द्रित करा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button