इतर

खासदार राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत नारायणगावात नवरदेव झळकला!

नारायणगाव दि 23 –शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर सामाजिक जनजागृती करणाऱ्या नवरदेव चित्रपटाचा 75 वा शो पुणे जिल्ह्यात नारायणगाव येथील लक्ष्मी मल्टिप्लेक्स थेटर मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला


चित्रपटाच्या वेळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली , तरी देखील शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला चित्रपट पाहण्यासाठी पुरुषांबरोबरच महिला भगिनींनी देखील लक्षणीय उपस्थिती होती
संगमनेर तालुक्यातील शेतकरी नेते संतोष रोहम यांनी नारायणगाव येथे जाऊन हा चित्रपट ऐकला कारण कोरोना काळात त्यांचे दोन्ही डोळे गमावलेले असल्याने त्यांनी हा चित्रपट उपस्थित राहून ऐकला आणि स्वतःदृष्टीहीन असताना देखील या चित्रपटाचे त्यांनी कौतुक केले कारण त्यांना या चित्रपटाचे संवाद आणि विषयानुरूप गाणे खूप आवडले


दोन तास पंचवीस मिनिटे प्रेक्षकांना एका जागेवर खिळवून ठेवणारा हा सामाजिक चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येक गावच्या स्वंयसेवी संघटनांनी तसेच शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी या वेळी व्यक्त केले
उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देत आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या निर्माता व
पत्रकार निरंजन देशमुख यांच्या नवरदेव चित्रपटाचे शेट्टी यांनी तोंडभरून कौतुक केले आणि शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत समस्येची गंभीर बाब रुपेरी पडद्यावर अतिशय दर्जेदारपणे आणि प्रभावीरीत्या मांडल्याचे त्यांनी या वेळी सांगितले
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी नवरदेव चित्रपटाचा 75 वा शो नारायणगाव येथे पाहताना

नवरदेव चित्रपट पाहण्याचा आनंद घेताना खा.राजू शेट्टी

पत्रकार निरंजन देशमुख यांनी 75 शो नवरात्र उत्सव गणेशोत्सव यात्रा जत्रा त्याचबरोबर काही थेटर मध्ये प्रदर्शित करून सामाजिक जनजागृतीच्या हेतुने हा उपक्रम राबविला आहे, ग्रामीण भागापर्यंत हा चित्रपट पोहोचविण्यासाठी एलईडी स्क्रीनवर विनामूल्य सामाजिक बांधिलकी जपत हा चित्रपट गावोगावी प्रदर्शित केला आहे, 2022 सालापासून या चित्रपटाचे काम ते करत आहेत

खासदार राजू शेट्टी यांचे सोबत निर्माता निरंजन देशमुख

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button