इतर

पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात आषाढी एकादशी साजरी.

पुणे प्रतिनिधी

पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृह आणि वेणुबाई बालगृह मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी झाली. वसतिगृह परिसरात विठुराया नामाचा गजर करीत मुलींनी दिंडी मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

एकादशी निमित्त सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळात कु. युगंधरा पाध्ये यांचा किर्तनाचा अतिशय सुंदर कार्यक्रम झाला.या किर्तनामधून ताईने हनुमानाची प्रभू श्रीराम चंद्रावर असलेली निष्ठा,प्रेम व भक्ती यांचे वर्णन करून ते आचरणात आणावे याबाबत मुलींना मार्गदर्शन केले. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जीवनपट अभंगाच्या स्वरूपात अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने मुलींसामोर मांडला . त्यांच्या शौर्याचे धडे मुलींनी घेऊन आपल्या जीवनात त्यांच्यासारखं शूर कणखर, विचारी व धाडसी बनावे. आजच्या युगात त्याची खूप गरज आहे हे मुलींना विविध विविध पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या विविध गोष्टींतून पटवून दिले. श्रीरंग आठवले यांनी हार्मोनियम व श्री मंदार फडके यांच्या तबला वादनाने कार्यक्रम अधिक सुंदर झाला.

वसतिगृह प्रमुख श्रीम. पूनम पोटफोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले , उपप्रमुख कांचन फाळके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर अतिशय सुंदर कीर्तन सोहळ्याबाबत श्रीम. रुक्मिणी बागुल यांनी पाहुण्यांचे आभार मानले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृहतील विद्यार्थिनी कु . शितल पवार आणि कु . दुर्वा गोरे यांनी केले. वसतिगृहातील 1200 मुली व स्टाफ कार्यक्रमासाठी उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button