इतर

मान्हेरे व शेंडी केंद्राची संयुक्त केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

प्रतिनिधी / श्री जाधव एस. के. दि. २९


मान्हेरे व शेंडी केंद्राची संयुक्त केंद्र स्तरीय शिक्षण परिषद जि. प. प्राथमिक शाळा वाकी (ता. अकोले) येथे आयोजित करण्यात आली. आज गुरुपौर्णिमा असल्याने मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून वर्ग कार्याला सुरुवात झाली.

या शिक्षण परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक खिरविरे बीट शिक्षणविस्तार अधिकारी श्री ज्ञानेश्वर माळवे होते. यावेळी दोन्ही केंद्राच्या वतीने गुरुपौर्णिमे निमित्त केंद्रप्रमुख श्री तुकाराम एरंडे यांची शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आदरपूर्वक स्वागत व सन्मान करण्यात आला.
शेंडी व मान्हेरे केंद्रप्रमुख श्री तुकाराम एरंडे यांनी वेद व्यास यांच्या जयंतीनिमित्त गुरुपौर्णिमा दिनी उपस्थित सर्व शिक्षक बांधवांना शुभेच्छा दिल्या. शिक्षकांना संबोधित करताना ते म्हणाले,” आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करायची आहे. त्याचबरोबर तीन वर्षासाठी शाळा विकास आराखडा, तसेच विद्यार्थ्यांचे आधार अपडेट, विद्यार्थी प्रमोशनकरणे, तसेच नवीन प्रवेश एक नंबरला दाखल करून घेणे. कारण यु-डायसचे विद्यार्थीच ग्राह्य धरले जाणार आहेत. व्ही. एस. के. उपस्थिती नोंदवणे बंधनकारक आहे. प्रत्येक शाळेत सी.सी.टीव्ही कॅमेरे असावेत. प्रत्येक शाळेत व्यसनमुक्त शिक्षक असावेत जर शाळेत व्यसन करणारे शिक्षक असतील तर मुख्याध्यापकांनी एफ. आर. आय. दाखल करावे. शालेय पोषण आहार संदर्भात अन्न परवाना, सर्व रेकॉर्ड अपडेट ठेवणे. पंधरा दिवस विद्यार्थी गैरहजर असल्यास वरिष्ठांना कळवून पालक भेट घ्यावी. नवोदयचे फॉर्म शंभर टक्के भरणे आवश्यक आहे.विनोबा ॲप मधील दोन्ही भाग परिपूर्ण भरलेले असावेत. शाळा पूर्वतयारी, आनंददायी शनिवार रजिस्टर ठेवून उपक्रमांबाबत नोंदी ठेवणे महत्त्वाचे आहे.

सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती, वृक्ष लागवड जीपीएस फोटो पाठवणे. प्रत्येक शिक्षकांनी उल्हास ॲपवर किमान एक निरक्षर ऍड करावा. अग्निशमन यंत्र रिफील करा. प्रत्येक शाळेत जी.आर फाईल असावी त्यामध्ये वेळोवेळी प्राप्त झालेले जी. आर. उपलब्ध असावेत. नवीन वेळापत्रक,विद्यार्थी पोर्टलवर नोंदवणे, चित्रकला एलिमेंट्री, इंटरमिजिएट परीक्षेचे फॉर्म भरणे. केंद्रातील प्रत्येक शाळेत दिव्यांग विद्यार्थी यांची सविस्तर माहिती उपलब्ध असावी. सदर कामे तातडीने पूर्ण करणे, मिशन आरंभ अंतर्गत जादा तासिका सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत घेण्यात याव्यात “.

श्री युवराज तळपे (सुकेवाडी ) यांनी पी. एम. ई. विद्या चॅनल वेळापत्रक या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
श्री अर्जुन तळपाडे यांनी शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले,” केंद्रातील एकही शाळा 0% नसावी. दोन्ही केंद्रातील निकाल चांगला आहे. टी. ई. टी. पास होण्यासाठी स्कॉलरशिप चा फायदा होतो. मुलांना वाचन आले पाहिजे. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघून घेणे. परीक्षेत कोणता प्रश्न येतो हे शिकविणे. मेहनत घेतली तर यश नक्कीच येते. सर्वप्रथम मुलांना काय येते हे बघावे. परीक्षेत गुणवत्तेवर आधारित प्रश्न येत असतात म्हणून शिक्षक बांधवांनी कामचुकारपणा करू नये. मुले प्रगत करण्यासाठी मदत करावी. यशाचा विचार करू नये. जे येत नसेल ते ऑनलाईन शोधा. फक्त धडा शिकवू नये. शिक्षण ही फार मोठी जबाबदारी आहे. गुणवत्ता यादीत विद्यार्थी आले पाहिजेत हा विचार शिक्षकांनी करावा”. हे सांगत असताना जि.प. प्राथमिक शाळा टिटवी, जि.प.प्राथमिक शाळा शेणीत, जि प. प्राथमिक शाळा मुतखेल या शाळेचा निकाल चांगला लागल्याचे ही अधोरेखित केले.
श्री भागवत भांगरे (मुतखेल ) यांनी केंद्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार शालेय व्यवस्थापन समिती रचना व कार्य यांची सविस्तर अभ्यासपूर्ण माहिती दिली. येत्या पाच ऑगस्ट पर्यंत सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळांनी शाळा व्यवस्थापन समिती गठित करायची आहे.
श्री भरत भांगरे (चिचोंडी ) यांनी शालेय स्तरावर आधार कार्ड उपलब्ध नसल्यास व आधार कार्ड काढण्यास अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड कसे सुलभरीत्या काढावेत याचे मार्गदर्शन केले.
श्री दीपक साळवे (देवीचीवाडी) यांनी सुलभक म्हणून काम केले. मान्हेरे केंद्रात नव्याने वाकी येथे हजर झालेले श्री हेमंत मुठे व शेंडी केंद्रातील बारी येथे हजर झालेले श्रीकांत नरवडे यांचे दोन्ही केंद्राच्या वतीने शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.

जि. प. प्राथमीक शाळा वाकी शाळेचे मुख्याध्यापक श्री भीमा कोकतरे ,श्रीमती यशोदा ढगे , श्री हेमंत मुठे , श्री अर्जुन तळपाडे यांचे केंद्रप्रमुख श्री तुकाराम एरंडे यांनी शिक्षण परिषदेच्या उत्कृष्ट नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
शिक्षण परिषदेच्या शेवटी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे केंद्र प्रमुख श्री तुकाराम एरंडे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button