मुंबई च्या उपासना सोसायटी चे वतीने आदिवासी भागात शालेय साहित्य वाटप!

अकोले प्रतिनिधी-
आदिवासी व दुर्गम भागातील जि.प. शाळा चंदगीरवाडी व इदेवाडी केंद्र खिरविरे ता. अकोले येथे उपासना Lakshmi मुंबई च्या श्रीमती दीप्ती कशाळकर व कॅनडा येथील अश्विन डिसुझा यांच्या उदार दातृत्वातुन रुपये 25000/- चे विदयार्थांना शालेय साहित्य वहया, पेन, पेन्सिल, शार्पनर, खोडरबर, शुज, सॉक्स, स्वेटर,खेळ साहित्य व अदयावत स्कुल किटचे गुरुवार दि 18 ऑगस्ट २०२२ रोजी वितरण करण्यात आले.
या दोन्ही शाळांना २५०००/-रु. खर्चाचे साहित्य व भेटवस्तू देऊन आपले सामाजिक दातृत्व व कर्त्यव्य पार पाडले.या प्रसंगी मुख्याध्यापक रामदास आवारी , मुख्याध्यापक बाळासाहेब डेरे व सर्व शिक्षक आणि विदयार्थी उपस्थित होते.
दिप्ती मॅडम व डिसुझा सर यांनी शाळेतील उपक्रम व अध्ययन पुरक उपक्रम याविषयी माहिती जाणुन घेतली. मुलांचा अभ्यास सामान्यज्ञान खेळ व राबविलेले उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले. व मुलांचे विशेष कौतुक केले.
स्वागत व प्रास्ताविक करतांना मुख्याध्यापक रामदास आवारी म्हणाले की, शाळेने उपासना सोसायटी,मुंबई यांचेकडे शाळेला मदत मिळावी म्हणून मिशन आपुलकी अंतर्गत पत्रव्यवहार केला होता.त्याला दीप्ती कशाळकर उपासना सोसायटी मुंबई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. केंद्र प्रमुख विजय भांगरे,विस्तार अधिकारी संभाजी झावरे, बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे व गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मुख्याध्यापक रामदास आवारी व बाळासाहेब डेरे यांनी आभार व्यक्त केले.
सूत्रसंचालन शरद तमनर यांनी केले.तर कार्यक्रमाचे नियोजन भाऊराव भांगरे यांनी केले.आभार बाळासाहेब डेरे यांनी मानले.
