विकास कामात कोठेही कमी पडणार नाही : सभापती काशिनाथ दाते

तिखोल येथे विकास कामांचे भूमिपूजन
पारनेर प्रतिनिधी
तिखोल येथे १९.५० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच नबाजी मंचरे होते तर प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, शिवसेना तालुका महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, उप तालुकाप्रमुख सुनिता मुळे, तालुका शेतकरी प्रमुख कैलास न-हे, संघटक दीपक उंडे, उप तालुका प्रमुख सुभाष सासवडे, युवा सेना विभाग प्रमुख अक्षय गोरडे प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना सभापती काशिनाथ दाते म्हणाले आत्तापर्यंत अनेक विकास कामे मार्गी लावली यापुढेही विकास कामात कोठेही कमी पडणार नाही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यात भरपूर निधी आणला, कार्यकर्त्यांनी सुचवलेली सर्वच कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तिखोल गावासाठी विकास कामात नेहमीच झोपते माप दिले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभांच्या योजना यामध्ये शिलाई मशीन, कडबाकुट्टी, शाळेतील मुला-मुलींना सायकल यासारख्या वैयक्तिक लाभाच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण केले. राजकारण विरहित विकास कामांना प्राधान्य दिले यापुढेही आपली जबाबदारी आहे विकास काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, महिला आघाडी प्रमुख प्रियंका ताई खिलारी, माजी सरपंच सुभाष ठाणगे, शिवाजी धोंडीबा ठाणगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले शिवाजी धोंडीबा ठाणगे यांनी कुरणवस्ती तसेच पाळपटा, कावरे वस्ती येथे सी.डी. वर्क करून देण्याची मागणी सभापती दाते यांच्याकडे केली असता पुढील कार्यकाळात ती करून देण्याची मागणी सभापती दाते यांनी मान्य केली.
यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिखोल, काळुनगर येथे १ खोली बांधकाम करणे – ९.५० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिखोल येथील शाळा खोल्या दुरुस्त करणे – ५ लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिखोल काळुनगर येथील वर्ग खोल्या दुरुस्त करणे – १ लक्ष, जिल्हा परिषदेच्या पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत बिरोबा केटी ते सोनारी वस्ती, मंचरेवस्ती रस्ता सुधारणा करणे – ४ लक्ष या कामांचे उद्घाटन करण्यात आले.
दाते सरांनी २५ लक्ष रुपयांचा तिखोल मधील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वात दर्जेदार पुल करून दिला, बर्वे वस्ती, करडेवस्ती येथील पाण्याची टाकी, रस्ता मजबुतीकर करणे २५ लक्ष, रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी ८ लक्ष, वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये तिखोल गावास झुकते माप दिले, दाते सरांनी तिखोल गावासाठी एक कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लावली असून, विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते : सुभाष ठाणगे सर माजी सरपंच तिखोल
यावेळी ग्राम. सदस्य पोपट मंचरे, विजय ठाणगे, महिला आघाडी शाखा प्रमुख संगीता ठाणगे, आशुतोष ठाणगे, चेअरमन शिवाजी गंगाराम ठाणगे, शाहीर संघटना अध्यक्ष शिवाजी ठाणगे,ग्राम.सदस्य राघू ठाणगे, भाऊसाहेब ठाणगे, ग्राम. सदस्य योगेश ठाणगे, संजय दोरगे, भागा ठाणगे, आनंदा ठाणगे, राजु पुरी, गुलाब ढवळे, हरिभाऊ चिमा ठाणगे, ज्ञानदेव खराबी, पेरुबाई ठाणगे, रामदास ठाणगे, भगवंता ठाणगे, रामदास तात्याबा ठाणगे, ग्राम. सदस्य भानुदास हरी ठाणगे, बबन ठाणगे गुरुजी, धोंडीबा ठाणगे, सोसा. सदस्य सुभाष कावरे, ठकसेन ठाणगे गुरुजी, उत्तम साळवे, बाबासाहेब हिंगडे, मा.उपसरपंच भारत ठाणगे, तुकाराम ठाणगे, रावसाहेब ठाणगे, शाळा समिती अध्यक्ष गणेश ठाणगे, मा. चेअरमन शिवाजी नाना ठाणगे, धोंडीभाऊ ठाणगे, भाऊसाहेब आप्पा ठाणगे, रामु ठाणगे, नाथा ठाणगे गुरुजी, डॉक्टर धरम, रंगनाथ ठाणगे, कृषी अधिकारी लक्ष्मण ठाणगे, संभा नाना ठाणगे इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्रसंचलन शिवाजी ठाणे यांनी केले तर आभार सुभाष कावरे यांनी मानले.
